Type Here to Get Search Results !

वारजे मधील 15 वर्षाच्या मुलाने चोरलेल्या 3 रिक्षांसह 8 दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

15 years boy, resident in warje ramnagar stolen 8 vehicles with 3 rickshaws

 

15 years boy, resident in warje ramnagar stolen 8 vehicles with 3 rickshaws

 

पुणे, दि.21 ऑगस्ट 2024 (Checkmate Times): वारजे रामनगर मध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलाने चोरी केलेल्या 3 रिक्षा आणि 5 दुचाकी अशा 8 वाहनांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे शहर पोलिसांच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. यामध्ये 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर वारजे पोलिस स्टेशन, सिंहगड रोड पोलिस स्टेशन, कोथरूड पोलिस स्टेशन, येरवडा पोलिस स्टेशन आणि शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दींमध्ये त्याने या वाहनांची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा, याकरीता विशेष मोहिम राबवून, कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पुणे शहर पोलिसांच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 मधील अधिकारी व अंमलदार वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मधील दुचाकी चोरीच्या गुन्हयातील अज्ञात आरोपी आणि चोरीस गेलेल्या दुचाकी गाडीचा शोध घेत होते. दरम्यान पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वारजे माळवाडी मधून रामनगर भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या संजय काकडे यांची मिळकत असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ एक मुलगा दुचाकी गाडीसह उभा असून, सदरची गाडी ही चोरीची असलेबाबतची बातमी मिळाली.

 

 

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकावडे, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या सूचनांप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळूखे, पोलिस हवालदार गणेश ढगे, बाळू गायकवाड, धनंजय ताजने, पोलिस नाईक रवींद्र लोखंडे, पोलिस शिपाई महेश पाटील, साईकुमार कारके, महिला पोलिस हवालदार वारे, महिला पोलिस शिपाई बनकर यांच्या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी निरनिराळ्या बाजून जाऊन, सापळा रचून, त्याला ताब्यात घेतला. यावेळी त्याच्याकडे मिळून आलेल्या मोटार सायकलीबाबत त्याला विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावेळी त्याच्याकडे मिळून आलेल्या मोटारसायकलचे चासिस नंबर व इंजिन नंबर आणि वारजे माळवाडी पोलिस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्याची पडताळणी केली असता, हि तीच मोटारसायकल असल्याची निष्पन्न झाले.

 

 

यावेळी त्या मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याचे वय 15 वर्ष असून, तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालकांसमक्ष आणखीन चौकशी करता त्याने 3 ऑटो रिक्षा आणि 5 दुचाकी गाड्या चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात सांगितले. यामध्ये वारजे पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दोन वाहनचोरीचे गुन्हे, कोथरूड पोलिस स्टेशन हद्दीतील एक, सिंहगड रोड पोलिस स्टेशन हद्दीतील एक, येरवडा पोलिस स्टेशन हद्दीतील तीन आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील एक अशा 8 वाहनांच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात 2 लाख 50 हजार रुपये किमतीची सदरील सर्व वाहने जप्त करण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.