Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.20 ऑगस्ट
2024 (Checkmate Times): वारजे मधून एका सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह ताब्यात
घेण्यात पुणे शहर पोलिसांच्या
गुन्हे शाखा युनिट 3 ला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने
बिबवेवाडी मध्ये एकाला पिस्तुल लावून धमकावल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे.
त्याच्यावर वारजे पोलिस स्टेशन मध्ये आर्म अॅकटनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वांतत्र्यदिनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-पोलीस
आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर
पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश
इंगळे, यांचे मार्गदर्शन आणि
सुचनेनुसार गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ
पोलीस निरिक्षक रंगराव पवार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलिस हवालदार शरद वाकसे, विनोद भंडलकर, सुजित पवार, केदार
आढाव, संजीव कळंबे, पोलिस शिपाई इसाक पठाण, हरिष
गायकवाड, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रतिक
मोरे, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांचे पथक रेकॉर्ड वरील गुन्हेगार
तपासणी, लॉज तपासणी, अवैद्य धंद्यांवर कारवाई करणे आणि कायदा सुवस्थेच्या
दृष्टीकोनातून गस्त घालत असताना, पोलिस
अंमलदार प्रतिक मोरे यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडून याबाबत माहिती
मिळाली होती.
पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली होती की, मागील दोन दिवसापूर्वी
अपर डेपो, बिबवेवाडी, पुणे येथे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताने तुषार शेडगे (रा. बिबवेवाडी, पुणे) याला धमकवण्यासाठी पिस्तुल दाखवले होते. तो सध्या वारजे माळवाडी मधील
रामनगर रस्त्यावर असलेल्या गणेशपुरी भागात सार्वजनिक रोडवर थांबलेला असून, त्याची वर्णनासह बातमी मिळाली
होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक मोरे यांच्यासह युनिट 3 च्या पथकाने सदर ठिकाणी जावून, नमुद इसमाचा शोध घेतला असता, मिळालेल्या वर्णनाचा
इसम दिसून आला. यावेळी पथकाने त्याच्यावर झडप घालून, त्याला ताब्यात घेतले असता,
त्याच्याकडे 40 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल मिळून आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक
ज्ञानेश्वर ढवळे यांनी ते तत्काळ
जप्त करून ताब्यात घेतले.
यावेळी त्याची विचारपूस केली असता, त्याचे नाव गणेश उदय जाधव (वय
21 वर्षे, रा.
गणेशपुरी सोसायटी, वारजे
माळवाडी, पुणे) असल्याचे समोर आले. त्याच्या
विरूदध तो विधीसंघर्षित बालक असल्यापासून खून आणि बेकायदेशीर जमाव जमवुन दुखापत करणे असे कोथरूड आणि सिंहगड पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.
त्याचे विरुद्ध अग्नीशस्त्र बाळगलेबाबत
पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share