Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
In Karvenagar, thieves snatched the jewelery from the necks of two women in two days
पुणे, दि.29 ऑगस्ट
2024 (Checkmate Times): कर्वेनगर मध्ये दोन दिवसांत दोन महिलांच्या गळ्यातील
सोन्याची आभूषणे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून जबरी चोरी करून
नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला निघालेल्या या
महिलांच्या गळ्याला या चोरट्यांनी हात घातला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अलंकार
पोलिस स्टेशन, वारजे पोलिस स्टेशन, सिंहगड रोड पोलिस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरटे
सक्रीय झाले आहेत की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
याबाबत पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.26 ऑगस्ट 2024 सकाळी पावणे सहा वाजता घडली.
सिंहगड रोडला राहणाऱ्या 47 वर्षीय महिला या सकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला बाहेर
पडल्या असताना, कर्वेनगर मधील बाबुराव पडवळ रोडवरून जात असताना, दुचाकीवरून
आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे
मंगळसूत्र हिसका मारून, जबरी चोरी करून नेले. याबाबत अलंकार पोलिस स्टेशन मध्ये
गुन्हा दखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत, बुधवार
दि.28 ऑगस्ट 2024 सकाळी साडेसहाच्या सुमारास, कर्वेनगर मध्ये सदरील घटना घडली.
कर्वेनगर मध्ये राहणाऱ्या 66 वर्षीय ज्येष्ठ महिला फिर्यादी या सकाळी मोकळ्या हवेत
फिरायला बाहेर पडल्या होत्या. दरम्यान त्या राजाराम पुलाजवळील पद्मावती मंदिराजवळ
त्या आलेल्या असताना, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 75
हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. याबाबत वारजे
पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक
तेजस्वी पवार करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share