Type Here to Get Search Results !

तीन दिवसांत दोन खुनाच्या घटनांनी हादरला सिंहगड रोड; संशयित गजाआड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

Two Murder’s in Three Days on Sinhagad Road; Suspect Behind Bars

 

Two Murder’s in Three Days on Sinhagad Road; Suspect Behind Bars

 

पुणे, दि.26 ऑगस्ट 2024 (Checkmate Times): सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांपुर्वीच एका तडीपार सराईत गुन्हेगाराचा हातोड्याने वार करत खून करण्यात आला होता. हि धक्कादायक घटना ताजी असतानाच आता आणखीन एका खुनाच्या घटनेने सिंहगड रस्ता हादरला आहे. दोन्ही घटनांमधील संशयित आरोपी गजाआड जारी करण्यात आलेले असले, तरी दहीहंडी, गणेशोत्सव, त्यामागे येणारे नवरात्र आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेने नागरिक चिंताग्रस्त झालेले आहेत. तर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका शांततेत पार पडतील का असाही प्रश्न नागरिकांच्या मनात घोंघावू लागला आहे.

 

 

साध्या रेनकोटवरुन झालेल्या वादातून सिंहगड रस्त्यावरील हि खुनाची घटना घडली आहे. यात एका तरुणाचा भर रस्त्यात चाकू छातीच्या खाली पोटात, डाव्या हाताच्या काखेत खुपसून निघृण खून करण्यात आला असून, ही घटना झिल कॉलेज चौकात असलेल्या मराठा हॉटेल, स्वाद हॉटेलच्या समोर, काल रविवार दि.25 ऑगस्ट 2024 रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य श्रीकृष्ण वाघमारे (वय. 23, रा. कारी, ता. धारु, जि. बीड) असे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सिद्धेश्वर मोरे (वय. 24, रा.वाल्हेकर चौक, नऱ्हे, पुणे) याच्या तक्रारीवरून, सुरेश परमेश्वर भिलारे (वय. 18, रा. जाट नांदूर, ता. शिरूर, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी आणि मयत हे एका खोलीत राहत होते. मयात आदित्य हा दिवसा डॉमिनोजमध्ये तर रात्री अमेझॉनमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. त्याची आणि आरोपी सुरेश भिलारे याची दुपारी भांडणे झाली होती. याबाबत मयत आदित्यने दुपारी घरी येऊन फिर्यादीला सांगितले की, मला डॉमिनोजमधील मॅडमने रेनकोट दिला होता. तो सुरेशने मला काढायला भाग पाडले. यानंतर आमच्यात वाद झाले. तेव्हा तो माझ्या बोटाला चावला. आपण त्याला भेटुन वाद मिटवू असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीने सुरेशला रात्री फोन केला. मात्र सुरेशने फोनवर बोलण्यास नकार देत नऱ्हे येथील हॉटेल मराठा येथे भेटायला बोलावले होते. त्यानुसार फिर्यादी, मयत आदित्य, रतन शिंगाडे, सचिन तांगडे असे सर्व रुममेट त्यांच्या कारमधून सुरेशला भेटायला गेले. तेथे सुरेशने आदित्यला उद्देशून शिवी दिल्याने, आदित्यने सुरेशच्या कानाखाली मारली. यामुळे सुरेशने त्याच्या पँटच्या खिशातील लपवलेला चाकू काढून आदित्यच्या डाव्या काखेजवळ मारला.

 

 

अचानक झालेल्या सशस्त्र हल्ल्याने भेदरलेला आदित्य जीव वाचवण्यासाठी घाबरुन झिल कॉलेजच्या दिशेने पळू लागला. त्याच्या मागे सुरेशही पळत गेला. थोड्याच अंतरावर त्याने आदित्यला पकडून त्याच्या छातीत चाकू मारला. यामुळे आदित्य रस्त्यावर कोसळला. कारमधून फिर्यादीसह तीघे तेथे पोहचले. तेव्हा आरोपीने चाकू दाखवत त्यांना रोखले. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांनाही त्याने चाकू दाखवत धमकावले. यामुळे त्याच्या जवळ जाण्याची कोणीच हिम्मत दाखवली नाही. यानंतर सुरेश तेथून पळून गेला. यावेळी सर्वांनी मिळून आदित्यला उपचारार्थ रुग्णालयात हलवले असता, रुग्णालयाकडून त्याला मृत घोषीत करण्यात आले.

 

 

एकूणच अचानक भर वर्दळीच्या रस्त्यावर रात्री दहा वाजता घडलेल्या घटनेने, नऱ्हे परिसरासह सिंहगड रस्त्यावर बातमी हि हि म्हणता पसरली. दोनच दिवसांपूर्वी अशाच वर्दळीच्या असलेल्या मुख्य रस्त्यावर घडलेली खुनाची घटना ताजी असताना घडलेल्या या घटनेने चर्चांना आणखीन उधाण आले आहे. त्यातच दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर अगोदरच भांडणे आणि मारामाऱ्या होण्याच्या शक्यता असताना, घडलेल्या या घटनांनी नागरिकांच्या मनावर दडपण आल्याचे नागरिक बोलत आहेत. तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगोदरच खडकवासला विधानसभा मतदार संघात चुरस निर्माण झालेली असताना, घडलेल्या या घटनेने सिंहगड रोड पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार असल्याचे बोलले जाते आहे. भलेही या खुनांचे कारण, हे राजकारण नसेल मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सिंहगड रोड पोलिसांना कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.