Type Here to Get Search Results !

दहीहंडी सजवून कर्वेनगरकडे चाललेल्या तरुणांवर जीवघेणा हल्ला; दोन जण गंभीर जखमी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

Two people were seriously injured in attacked in Dr. Babasaheb Ambedkar Chowk Warje

 

Two people were seriously injured in attacked in Dr. Babasaheb Ambedkar Chowk Warje

 

पुणे, दि.30 ऑगस्ट 2024 (Checkmate Times): दहीहंडी सजवण्याचे काम पूर्ण करून वारजे मधून कर्वेनगरकडे निघालेल्या दोघा तरुणांना जीवघेणी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारजे जुन्या जकातनाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सदरील घटना घडली असून, हल्लेखोर हल्ला करून पसार झाले आहेत. याबाबत वारजे पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या हल्यातील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

 

 

या हल्ल्यात जखमी असलेले निलेश वांजळे आणि त्यांचा भाऊ जयदीप कदम हे दहीहंडी सजवण्याचे काम पूर्ण करुन बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मोटारी’ने कर्वेनगरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांची मोटार डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आलेली असताना, चौकात असलेल्या सर्कलजवळ कर्वेनगर वरून आलेली सिल्वर रंगाची गाडी वेगाने येऊन थांबली. यावेळी निलेश वांजळे यांनी आपल्या गाडीचा ब्रेक मारला व त्या गाडीकडे पाहू लागले. यावेळी त्या सिल्वर रंगाच्या गाडीतून एक जण खाली उतरत, काय रे तुला गाडी जमत नाही का? असे म्हणून, वांजळे यांना शिवीगाळ करु लागला. यावेळी वांजळे आणि कदम दोघेही त्यांच्या मोटारीतून खाली उतरले. त्याचबरोबर समोरच्या सिल्वर रंगाच्या गाडीतील एकाने लाकडी दांडक्याने कदम आणि वांजळे यांच्यावर जोरदार हल्ला केला. यामध्ये कदम यांच्या हाताचे हाड दोन ठिकाणी मोडले असून, वांजळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

 

 

याबाबत निलेश बाळासाहेब वांजळे (वय 30, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी रुग्णालयातून वारजे माळवाडी पोलिसात तक्रार दिली आहे. वारजे पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

 

जन्माष्टमीच्या अगोदर रामनगर मध्ये गाड्या फोडल्या

वारजे रामनगर भागात वाहनांच्या काचा फोडण्याच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाहीत. रामनगर मधील अण्णा भाऊ साठे चौकाजवळ लावण्यात आलेल्या तीन वाहनांच्या काचा फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यामध्ये एक जेसीबी, एक छोटा हत्ती आणि एका मारुती एर्टिगाचे नुकसान झाले. यामधील एकाच वाहनचालकाने वारजे प्लीस स्टेशन मध्ये काचा फोडल्याची तक्रार दिली असल्याचे समजते.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.