Type Here to Get Search Results !

आंबेगाव पठारावर महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या वडगावच्या चोरट्यास अखेर बेड्या

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

 

The thief of Vadgaon, who stole jewelery from women's necks on Ambegaon Plateau, was finally arrested

The thief of Vadgaon, who stole jewelery from women's necks on Ambegaon Plateau, was finally arrested

 

पुणे, दि.28 ऑगस्ट 2024 (Checkmate Times): आंबेगाव पठार भागात रस्त्याने चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून चोरून नेणाऱ्या चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. तो वडगाव बुद्रुक येथील रहिवासी असून, त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत तीन चोरीच्या घटनांची उकल झाली असून, पोलिस तपास करत आहेत.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास आंबेगाव पठारावरील महादेव मंदीरासमोरून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा दुचाकी वरून आलेल्या अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे आणि अवधुत जमदाडे यांनी तांत्रिक विश्लेषनाव्दारे पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा दुचाकीचा शोध सुरु केला होता. दरम्यान त्यांना लेकटाऊन भागात पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा गाडीवर एक संशयीत इसम दिसुन आला. यावेळी त्याला संशयावरून थांबवून, त्याच्याकडे चौकशी केली असता. तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

 

 

दरम्यान, पश्चिम प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुकत प्रविणकुमार पाटील, परिमंडळ 2 च्या पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विनोद कांबळे यांच्या पथकाने पकडलेल्या संशयिताला विश्वासात घेऊन, त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान सदरील संशयितास अटक करून, त्याच्याकडे तपास करता त्याने एकूण 3 गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे कबूल केले. तर त्याचेकडुन 2 लाख 25 हजार रुपये किमतीचे 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, हार तसेच दुचाकी गाडी जप्त केली आहे. समर्थ राजू कोंथीबिरे (वय. 26 वर्षे, रा. निवृत्तीनगर, वडगाव बुद्रुक, पुणे, मुळ रा. सोलापुर) असे त्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.