Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
New villages improved; But the last rites have to be done in the dark in the Warje cemetery
पुणे, दि.29 ऑगस्ट
2024 (Checkmate Times): वारजे माळवाडी मधील स्मशानभूमी मध्ये अंधारामध्ये
अंत्यविधी करण्याची वेळ वारजे मधील रहिवाश्यांना आल्याची धक्कादायक बाब समोर आली
आहे. या ठिकाणी आज गुरुवार दि.29 ऑगस्ट 2024 हा प्रकार घडलाय. यामुळे अंत्यविधीला
आलेल्या नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. पुणे मनपा समावेशानंतर शेजारील शिवणे
आणि उत्तमनगर भागातील स्मशानभूमी सुधारल्या, मात्र वारजेची स्मशानभूमी सुधारत
नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केलाय.
आज वारजे राजयोग भागातील
एका कुटुंबातील एका महिलेचे निधन झाले. यानंतर दुपारी 4 वाजल्यापासून नातेवाईक
मंडळी स्मशानभूमी मध्ये सरण रचणे आणि अंत्यविधीच्या तयारीला पोचलेले होते. तर मयत
महिलेचे शव स्मशानभूमी मध्ये येण्यास सायंकाळचे 7 वाजले होते. यावेळी स्मशानभूमी
मध्ये अंधार होता. तेव्हा येथील दिवे लावण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला. मात्र
दिवे लागलेच नाहीत. विशेष म्हणजे नातेवाईक सुमारे 3 तास स्मशानभूमी मध्ये असताना,
तेथे कोणताही रखवालदार देखील उपस्थित नव्हता. त्यामुळे दिवे लावण्यासाठी कोणाची
मदत घ्यायची असा प्रश्न नागरिकांसमोर होता. याबाबत काही नागरिकांनी चेकमेट टाईम्स’शी
संपर्क साधत समस्या कथन केली. त्यानंतर सूत्र हलली आणि तत्काळ दिवे सुरु करण्यात
आले. यावेळी स्मशानभूमीला पुराच्या पाण्याचा वेढा होता, त्यामुळे दिवे बंद करण्यात
आले असल्याचे समोर आले आहे. मात्र पुराचे पाणी स्मशानभूमीखाली जाऊन 30 तास
उलटल्यानंतर देखील दिवे सुरु का केले नव्हते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित हतो
आहे. तर अशा घटना येथे वारंवार होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
दरम्यान वारजे
माळवाडी परिसर पुणे महानगरपालिकेत जाऊन आता 27 वर्ष लोटली आहेत. मात्र असे असताना
देखील अद्याप वारजे माळवाडी भागाला हक्काची स्मशानभूमी नाही. ग्रामपंचायत काळात
बांधलेल्या जागेतच अजून स्मशानभूमी आहे. मात्र आरक्षण असलेल्या जागेत, पूरपरिस्थितीतही
सुरु राहू शकणारी सुसज्ज स्मशानभूमी बांधण्यास पुणे महानगरपालिकेला अपयश आल्याचे
दिसते आहे. तर विद्युतदाहिनी अथवा साधा एक्सॉस्ट फॅन देखील वारजेच्या स्मशानभूमीत
नाही. मात्र त्याचवेळी शेजारील शिवणे मधील स्मशानभूमी मध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्या
अनिता इंगळे यांच्या पाठपुराव्याने एक्सॉस्ट फॅन लावण्यात आले आहेत. स्वच्छतागृह
बांधण्यात आले आहे. उत्तमनगर मध्ये आगामी काळात एक्सॉस्ट फॅन बसवण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे या भागाच्या अजून पहिल्या निवडणुका पण झालेल्या नाहीत. तरीही सोयी
सुविधा निर्माण होताना दिसतात. मग वारजे मधील स्मशानभूमी मध्ये सुधारणा का होत
नाही असा सवाल नागरिकांकडून केला जातोय.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share