Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.३० सप्टेंबर २०२४ (Checkmate Times): पुण्यातील जुने आणि निष्ठावान भाजपा
पदाधिकारी, कार्यकर्ते एकूणच भाजपाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे वारंवार समोर
येत असताना, आता कोथरूड भाजपाला आता आणखीन एक हादरा बसला आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्याने आता
तुतारी हाती घेतली आहे. मागच्या महिन्यापर्यंत जे सातत्याने सोशल मिडिया आणि
प्रत्यक्षातही भाजपाच्या बाजू मांडण्याचे करत होते. त्यांनी अचानक भाजपला राम राम
ठोकत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते
तुतारी हाती घेतली. यावेळी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह मान्यवर
उपस्थित होते.
“आजच्या दिवसात
माझ्या राजकीय जीवनात एक नवा अध्याय सुरू करत आहे. मी, सचिन
मुरलीधर फोलाने भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व पदांचा राजीनामा देऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.” राष्ट्रवादी
काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून, शरद पवार
साहेबांच्या प्रेरणेतून महाराष्ट्राच्या हितासाठी आणि समाजाच्या विकासासाठी मला
काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. नव्या मार्गावर चालताना, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची व साथ-सहकार्याची अपेक्षा आहे. सामाजिक
न्याय, प्रगती आणि सर्वसमावेशक विकास हेच माझे ध्येय आहे.
आपण या नव्या प्रवासात माझ्या सोबत असाल, याची मला खात्री
आहे. अशाप्रकारची सोशल मिडिया पोस्ट करत सचिन फोलाने यांनी भाजपाला राम राम केलाय.
अनेक वर्ष छावा
संघटनेचे पदाधिकारी आणि त्यानंतर २००९ पासून भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असलेले
सचिन फोलाने तत्कालीन आमदार आणि राज्यसभेच्या विद्यमान खासदार असलेल्या मेधा
कुलकर्णी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. “पक्षाने दिलेली जबाबदारी
म्हणून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सहकार आणि नागरी विमान वाहतूक
मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकांमध्ये आपण पक्षाचा प्रचार, प्रसार केला.
मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही,
पक्षाच्या कार्यक्रम उप्रकामांमध्ये विचारात घेतले जात नाही, आता पक्षात कार्यकर्त्यांपेक्षा
नेतेच अधिक झाले आहेत आणि त्यांना कार्यकर्त्यांची जाणीव नाही” म्हणून आपण पक्षाला
राम राम केल्याचे सचिन फोलाने यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. तर पुणे
शहरासह, कोथरूड विधानसभा मतदार संघात पक्ष अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नरत
राहणार असल्याचे फोलाने यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share