Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.२४ सप्टेंबर २०२४ (Checkmate Times): रोजच्या वाहतूक
कोंडीने त्रस्त झालेल्या पुणेकरांना येत्या गुरुवार दि. २६ सप्टेंबर २०२४ मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा
लागू शकतो. त्यामुळे शक्यतो गुरुवारी सायंकाळी अत्यावश्यक काम वगळता पुणेकरांनी
शहराच्या मध्यभागात जाण्याचे टाळल्यास, त्यांना होणार संभाव्य त्रास कमी होण्यास
मदत होईल असे वाहतूक विश्लेषकांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले आहे.
त्याला कारण देखील
तेवढेच ठोस असून, परवा चतुर्थीच्या मुहूर्तावर शनिवार दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी
कर्वेनगर मध्ये घेण्यात आलेला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा ४ मंत्री आणि
आमदार खासदारांची उपस्थिती असलेला कार्यक्रम अक्षरशः तोंडावर आपटला. बारामती लोकसभा
मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन असलेल्या कोथरूड’सह खडकवासला विधानसभा
मतदार संघाच्या संयुक्त कार्यक्रमाला त्याला २०० जणांची गर्दी देखील जमू शकली
नाही. वारकरी नसते तर उद्घाटक देखील कार्यक्रमाला थांबले नसते एवढी बिकट अवस्था
त्या दिवशी बघायला मिळाली. त्याची परिणीती सगळ्यांची खरडपट्टी करण्यात झाली असून, पुणे
शहरातील शिवाजी नगर ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज
भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवार दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५
वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एसपी कॉलेज मैदानावर पार पडणार
आहे. या कार्यक्रमाला लाखोंची गर्दी जमवण्याचे टार्गेट भाजपा पदाधिकारी
कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहे.
त्यासाठी पक्षाने
प्रभाग निहाय पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या असून, गर्दी जमवण्यासाठी खास
बसेसची व्यवस्था करून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे
दुपारपासूनच शहरातील सामान्य पुणेकरांच्या सेवेत असलेल्या पीएमपीएमएल’च्या बसेसची
संख्या कमी होत जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुणेकरांना प्रवासासाठी
अपुऱ्या बसेस शिल्लक राहिल्याने, उपलब्ध असलेल्या बसेस मध्ये दाटीवाटीने प्रवास करण्याची
वेळ पुणेकरांवर येऊ शकते, असा अंदाज वाहतूक विश्लेषकांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर
दुपारी ३ वाजल्यापासूनच पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची वाहने शहराच्या
चारही बाजूंनी मध्यवस्तीत दाखल होण्यास सुरुवात होईल. त्याचा परिणाम वाहतू कोंडीवर
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर मोदींच्या सुरक्षेसाठी काही रस्ते
वाहतुकीसाठी ठराविक कालावधीत बंद केले जातील. त्याचा ताण इतर रस्त्यांवर आल्याने
वाहतूक कोंडीत भरच पडू शकते. त्यामुळे पुणेकरांनी गुरुवारी अत्यावश्यक काम वगळता
शहराच्या मध्यवस्तीत जाण्याचे टाळावे असे आवाहन वाहतूक विश्लेषकांनी पुणेकरांची
गैरसोय होऊ नये यासाठी केले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share