Type Here to Get Search Results !

१७ वर्षांच्या चोरट्याकडून ७ मोबाईल, २ दुचाकींची चोरी; उत्तमनगर, सिंहगड रोड, पिंपरी हद्दीतील गुन्ह्यांची उकल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

7 mobiles, 2 bikes stolen by 17-year-old thief; Crime solving in Uttamnagar, Sinhagad Road, Pimpri area



7 mobiles, 2 bikes stolen by 17-year-old thief; Crime solving in Uttamnagar, Sinhagad Road, Pimpri area

 

पुणे, दि.8 सप्टेंबर 2024 (Checkmate Times): १७ वर्षांच्या मुलाकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि सात मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ला यश आले आहे. त्याला उत्तमनगर मधून ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून केटीएम बाईकसह एकूणलाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हे शाखा, युनिटचे पोलीस अंमलदार हे वारजे माळवाडी उत्तमनगर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयांवर कारवाई करणे, तसेच हवे असलेल्या गुन्हेगारांच्या शोधार्थ गस्त घालत असताना, पोलीस शिपाई प्रतिक मोरे यांना त्यांच्या विश्वसनीय खबऱ्याकडून बातमी मिळाली की, एका अल्पवयीन मुलाकडे चोरीची दुचाकी चोरीचे मोबाईल हॅन्डसेट असून, तो विक्रीकरीता उत्तमनगर परिसरात आलेला आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करून, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलिस उपनिरीक्षक महेश कोकाटे, पोलिस हवालदार शरद वाकसे, सर्जिव कळंबे, केदार आढाव, गणेश सुतार, विनोद जाधव, सोनम नेवसे, सुजित पवार, पोलीस अंमलदार प्रतिक मोरे, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिदे, हरिश गायकवाड, राकेश टेकावडे, इसाक पठाण यांच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

 

 

सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडेसुझुकी कंपनीची अक्सेस स्कूटर आणिमोबाईल हॅन्डसेट मिळून आले. नमुद विधीसंघर्षीत बालकास विश्वासात घेवून तपास केला असता, त्याने आणखी एक केटीएम आरसी १५ ही दुचाकी चोरी केली असल्याचे कबूल केले. त्याचेकडून सदरील मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे मिळून आलेल्या दुचाकी मोबाईल हॅन्डसेटबाबत तपास करता सुझुकी कंपनीची अक्सेस मोपेड चिखली पोलीस ठाणे येथून, तर केटीएम आरसी १५ सिंहगड रोड पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच त्याच्याकडे मिळालेल्या मोबाईल हॅन्डसेटपैकी एक मोबाईल हॅन्डसेट उत्तमनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून सद्यस्थितीला तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरीत मोबाईल हॅन्डसेटबाबत पोलिस तपास करत असून, त्याचेकडुन एकुणलाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी सदरील विधीसंघर्षित बालकास उत्तमनगर पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

 

 

या गुन्ह्यात मिळून आलेला १७ वर्षांचा विधीसंघर्षीत बालक हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, यापुर्वी त्याचे विरूध्द उत्तमनगर पोलिस स्टेशन, वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे १० गुन्हे, तसेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे (पोक्सो) आणि खुनाचा प्रयत्न करणे अशाप्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

 

अवैद्य गुटखा वेक्रेत्यांवर युनिटची नजर

कर्वेनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर भागात मोठ्या प्रमाणात अवैद्य गुटखा, सुगंधी सुपारी विक्री होत असल्याचा तक्रारी युनिट ३ ला प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने युनिट ३ चे पथक तपास करत आहे. कोणी कल्पेशची कल्पना नसताना चंदनाच्या आड मुक्याने आणि प्रेमाने आईस्क्रीम खात गुटखा विक्री करत असल्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास युनिट ३ शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.