Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.२१ सप्टेंबर २०२४ (Checkmate Times): राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी आज शनिवार दि.२१ सप्टेंबर २०२४ कर्वेनगर मध्ये एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत. त्यातच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघामध्येच, कार्यक्रम स्थळापासून अगदी जवळच पहाटे पहाटे घडलेल्या खुनाची बातमी येऊन आदळल्याने कर्वेनगर परिसरात हादरून गेला आहे. कर्वेनगर मधील उच्चभ्रू सोसायटी असलेल्या श्रीमान सोसायटी मध्ये हि खुनाची घटना घडली आहे. विशेष म्हणजे घरात पत्नी आणि मुली असताना हि घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वारजे पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अंदाजे एकच्या सुमारास, कर्वेनगर मधील राजाराम
पुलाजवळ असलेल्या कुलश्री कॉलनी मधील मयत राहत असलेल्या ८ नंबर बंगल्याचा दरवाजा
अज्ञात इसमांनी वाजवला. यावेळी कुटुंबप्रमुख मयताने दरवाजा उघडला असता, दारात
उभ्या असलेल्या तोंड झाकून आलेल्या अज्ञातांनी त्यांचावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यावेळी मयताने
आरडाओरडा केल्याने घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या. पण तोपर्यंत हल्लेखोर
पसार झाले. दरम्यान हल्ला झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवले असता, डॉक्टरांनी
त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात अमोल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२, रा. बंगला
नं.८, कुलश्री कॉलनी, श्रीमान सोसायटी जवळ, कर्वेनगर, पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू
झाला आहे.
मयत अमोल निवंगुणे हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असुन त्यांना तीन मुली, पत्नी आहे. झोपेत असतानाच, अचानकपणे डोळ्यासमोर झालेल्या या हल्ल्याने पत्नी, मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्या बोलण्याचा मनस्थीतीत नव्हत्या. त्यामुळे हा हल्ला कोणत्या उद्देशाने झाला, कोणी केला हे समजू शकले नाही. याबाबत राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४६) यांच्या तक्रारीवरून वारजे पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र व्हीआयपी मुव्हमेंट असल्याने मोठी गस्त असताना देखील झालेल्या या खुनी हल्ल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांची पथके रात्रभर निरनिराळ्या माध्यमाने तपास करत असून, लवकरच संशयित गजाआड असतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाअगोदर खडकवासला
आणि कोथरूड मतदार संघात घडलेल्या घटनांनी अशुभ संकेत
बारामती लोकसभा मतदार
संघात असलेल्या खडकवासला आणि पुरंदर विधानसभा मतदार संघातील विकासकामांचे भूमिपूजन
आज कोथरूड विधानसभा मतदार संघात असलेल्या कर्वेनगर मध्ये का होत आहे? याच्या चर्चा
असतानाच, ज्या वारजे मुठा नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे, त्या
पुलावरून गुरुवार दि.१९ सप्टेंबर २०२४ च्या रात्री व्यंकट हनुमंतराव बेळकुणे (वय ३८, रा. धावरगाव
बिदर, कर्नाटक) याने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सदरील घटना
खडकवासला विधानसभा मतदार संघात घडलेला अपशकून म्हटले जात असतानाच, आज
भूमिपूजनाच्या पहाटे पहाटे कार्यक्रम होत असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात
आणि कार्यक्रम स्थळापासून अगदी जवळच घडलेल्या खुनाच्या घटनेचा हा दुसरा अपशकून
असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share