Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
Significant changes in traffic flow on Sinhagad Road; Understand before you get stuck in the maze
पुणे, दि.3 सप्टेंबर 2024 (Checkmate
Times): सिंहगड रोड वाहतुक विभागाअंतर्गत सिंहगड रोडवरील, संतोष हॉल चौकातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी व
वाहतुक सुरळीत होण्यासाठी आनंदनगर रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांच्या काही सुचना असल्यास,
त्या पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफीस, बंगला
नं 6, जेल रोड, पुणे,
यांचे कार्यालयात 2 सप्टेंबर 2024
ते 16 सप्टेंबर 2024
पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात.
नागरीकांच्या सूचना व हरकतीचा विचार करुन अंतिम आदेश पारित करण्यात येतील
अशाप्रकारचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत वाहतुक सुरक्षित व
सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासनाच्या नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायद्यानुसार पोलीस उप-आयुक्त अमोल झेंडे याणीस सदरील आदेश दिले असून, सदर ठिकाणी यापुर्वी काही वाहतुक संदर्भातीस आदेश असतील ते रद्द करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत
1) आनंदनगर
रोडवरुन स्वारगेट कडे जाण्याकरीता संतोष हॉल चौकात येवुन, डावीकडे वळुन, वडगांव पुलाचे दिशेने सरळ पुढे 150 मीटर अंतरावर येवुन,
टायटन वॉच समोर यु टर्न घेवुन स्वारगेट मार्गीकेवर यावे.
2) वडगाव वरुन येवुन
आनंदनगर भागात जाण्याकरीता संतोष हॉल चौकात सरळ पुढे 100 मीटर अंतरावर येवुन,
आपटे कॉलनी समोरुन उजव्या बाजुस यु टर्न घेवुन, सिंहगड मार्गावर यावे व पुढे सरळ संतोष हॉल चौकात येवुन डावीकडे वळुन आनंदनगर
मार्गावर यावे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share