Type Here to Get Search Results !

व्हाटस् अॅप ग्रुपमध्ये घेऊन वारजे मधील महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

Fraud of six and a half lakhs from a woman in Warje by using a WhatsApp group

 

Fraud of six and a half lakhs from a woman in Warje by using a WhatsApp group


पुणे, दि.3 सप्टेंबर 2024 (Checkmate Times): गुंतवणुकीवर अधिक मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या अनेक घटना आपण नेहमीच ऐकतो. आता त्याला डिजिटल स्वरूप आलेले असून, व्हाटस् अॅपच्या माध्यमातून ग्रुप तयार करून, त्यातून गुंतवणुकीचे निरनिराळे पर्याय नागरिकांना दिले जात आहेत. त्यात काही जणांचा फायदा आणि काही जणांचा तोटा होतो, तर काही जणांची फसवणूक होऊ लागली असल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना वारजे मध्ये घडली असुन आदित्य गार्डन सिटी भागात राहणाऱ्या एका महिलेने वारजे पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पुणे मध्ये राहत असलेल्या 48 वर्षीय महिलेला, अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीने व्हाटस् अॅप ग्रुप मध्ये घेतले. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असा विश्वास दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करून, त्यांना 6 लाख 50 हजार 995 रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सदरील घटना 23 जून 2024 ते 19 जुलै 2024 दरम्यान घडली. यानंतर सदरील महिलेला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी वारजे पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख पुढील तपास करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.