Type Here to Get Search Results !

खडकवासला निवडणूक प्रशिक्षणासाठी तब्बल ५२६ अधिकारी कर्मचारी गैरहजर; कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today


As many as 526 officers absent for election training in Khadakwas; Legal action will be taken

 

 

पुणे, दि.३१ ऑक्टोबर २०२४ (Checkmate Times): खडकवासला विधानसभा निवडणुकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार असून, पहिल्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर आता खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयातर्फे कठोर कार्यवाहीची तयारी करण्यात आली आहे. गैरहजेरीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना नोटीसा देऊन त्यांच्या गैरहजेरीचे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत त्यांच्यावर फौजदारी कार्यवाहीसह कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.


 

 


निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना कामकाजात पूर्ण गंभीरतेने सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या मनुषबळ कक्षातर्फे विजय नायकल, प्रमोद भांड, विजय शिंदे, धम्मदीप सातकर, साहिर सय्यद आणि भूमेश मसराम यांनी दिली आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघात होणार असलेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी ३ हजार २९५ अधिकारी, कर्मचारी कामकाज पाहणार आहेत. त्यातील पहिल्या प्रशिक्षणासाठी तब्बल ५२६ जण गैरहजर राहिले आहेत. त्यातील १२२ जणांनी निवडणूक कार्यभार नको म्हणून अर्ज केलेले आहेत. तर ४०४ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. यातील आतापर्यंत ६६ जणांनी काम करण्यास तयारी दर्शवली आहे. तर ८९ जणांनी गैरहजर राहण्याचे खुलासे केलेले आहेत. मात्र यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये तब्बल २४९ जण फौजदारी कारवाईसाठी पात्र झालेले असून, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. एकूणच निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हि कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.


 

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.