Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.१० ऑक्टोबर २०२४
(Checkmate Times): कर्वेनगर - वारजे प्रभागातील झाशीची
राणी लक्ष्मीबाई आरोग्य तपासणी केंद्र, पुणे मनपाचा अधिकृत दवाखान्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते,
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. भविष्यात या
दवाखान्याच्या माध्यमातून १३ सुविधा मोफत उपलब्ध केल्या जाणार आहेत. यावेळी वसंत
कमल विहार सोसायटी, लभडे गार्डन आणि दत्त दिगंबर कॉलनी परिसरातील नागरिकांशी खासदार सुळे यांनी
हितगुज साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी माजी नगरसेवक सचिन दोडके, खडकवासला विधानसभा
मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, कार्याध्यक्ष त्रिंबक मोकाशी, पुणे शहर महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड विधानसभा
कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष
गिरीश गुरनानी, माजी कोथरूड युवा अध्यक्ष प्रमोद शिंदे, खडकवासला विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष मीनल धनवटे, विनोद हनवते, सुरज शिंदे, प्रभाग अध्यक्ष किशोर
शेडगे हे उपस्थित होते.
खडकवासल्याचे
दोन इच्छुक दोन टोकांना बसले
काल पुणे शहर आणि
जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मार्केटयार्ड येथील निसर्ग
मंगल कार्यालयात पार पडल्या. यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या देखील
मुलाखती झाल्या. यामध्ये सचिन दोडके, काका चव्हाण, बाळासाहेब धनकवडे, नवनाथ पारगे,
राहुल घुले, खुशाल करंजावणे, सुरेखा दमिष्टे, कुलदीप चरवड यांनी मुलाखती दिल्या. या
मुलाखती संपल्यानंतर सुप्रिया सुळे या खडकवासला विधानसभा मतदार संघातील
कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यावेळी एका टोकाला सचिन दोडके तर दुसऱ्या टोकाला
काका चव्हाण बसले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आले आहे.
यंदा एकदिलाने
खडकवासला घेणारच: त्रिंबक मोकाशी
याबाबत चेकमेट
टाईम्सशी बोलताना खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांनी सांगितले की, जरी
खडकवासला विधानसभा मतदार संघात नऊ जण इच्छुक असतील, तरी यंदा कोणालाही उमेदवारी
मिळाली तरी सर्वांनी मिळून एकदिलाने पक्षाचे काम करायचे आणि दिलेला उमेदवार निवडून
आणायचा निश्चय झालेला आहे. या कार्यक्रमावेळी कमी जागेत अनेकांना बसण्याचे आव्हान
होते. त्यामुळे जशा जागा उपलब्ध झाल्या, तसे सर्वजण बसले. यामध्ये दोघे दोन टोकाला
बसले म्हणजे कोणामध्ये काही वितुष्ठ झाले असल्याचे गैरसमज अथवा अफवा कोणीही पसरवू
नयेत. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू असा विश्वास त्रिंबक मोकाशी यांनी व्यक्त
केलाय.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share