Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.१० ऑक्टोबर २०२४
(Checkmate Times): भारतीय जनता पार्टीच्या डॅशिंग महिला नेत्या म्हणून राज्यभर
नव्हे तर देशभर माहित असलेल्या नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत वारजे मध्ये
होम मिनिस्टरचा सोहळा रंगणार आहे. खडकवासला विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
होणार असलेल्या या कार्यक्रमात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोने लुटण्याची
संधी वारजेकरांना भेटणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक सहभागी महिलेस मानाची साडी
देण्यात येणार आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक
दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री लाडकी
बहिण योजनेतील लाभार्थी महिलांचा मेळावा असलेल्या या कार्यक्रमात, प्रसिद्ध कलाकार
किरण पाटील हे या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे संचलन करणार आहेत. यावेळी प्रथम
विजेत्या महिलेस एक स्कूटर, दुसरे बक्षीस फ्रीज, तिसरे बक्षीस एलईडी टीव्ही, चौथे
बक्षीस संगणक सेट आणि पाचवे बक्षीस शिलाई मशीन असणार आहे. यावेळी चित्रा वाघ
आपल्या खास शैलीत महिलांच्या प्रश्नावर आवाज तर उठावणार आहेतच, शिवाय महिलांच्या
समस्या देखील जाणून घेणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात
सहभागी होण्याचे आवाहन दिलीप वेडेपाटील यांनी केले आहे.
दिलीप वेडेपाटील हे
खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार असून, गेली
अनेक दशके बावधन भागातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
नुसते स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट ग्रामीण भाग देखील असावा आणि त्याचबरोबर आपला
परिसर निसर्ग संपन्न असावा यासाठी वेडेपाटील नेहमी प्रयत्नरत असतात. त्यांनी काही
दिवसांपूर्वी घेतलेला दहावी बारावीच्या हजारो यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
असेल की कीर्तन महोत्सव, भिमाशंकर यात्रा असेल की वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध
करून दिलेली साधन सामुग्री असो दिलीप वेडेपाटील मतदार संघात सर्वसामान्यांच्या
गरजा ओळखून काम करताना दिसतात. त्यांच्या गरजांची पूर्तता करताना दिसतात. त्यामुळे
लोकांना विश्वासात न घेता मनमानी काम करणाऱ्या नेत्यापेक्षा, लोकांच्या गरजांना
प्राधान्य देणाऱ्या लोकप्रतिनिधीची मतदार संघाला अधिक गरज आहे असे मत सर्वसामान्य
नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share