Type Here to Get Search Results !

उसने पैसे घेतलेला पळून गेला, वसुलीवाला मित्राच्या मानगुटीवर बसला; कर्वेनगर मध्ये एकाचा मृत्यू

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

He ran away with the money, the collector sat on his friend's neck; One died in Karvenagar

 

पुणे, दि.५ ऑक्टोबर २०२४ (Checkmate Times): ठेकेदाराकडून एकाने उसने पैसे घेतले, मात्र वर्ष होऊन देखील ते परत नाही केले. ठेकेदाराने लावलेल्या पैशाच्या तगाद्यामुळे आणि मारहाण करण्याच्या देत असलेल्या धमक्यांमुळे पैसे घेतलेला घाबरून गावाला पळाला. मात्र या प्रकारामुळे यामध्ये कोणताही संबंध नसलेल्या त्याच्या रूम मधील सहकारी मित्राला प्राणाला मुकावे लागले. हा प्रकार कर्वेनगर मधील भालेकर वस्ती मध्ये घडला. याबाबत वारजे पोलिस स्टेशन मध्ये ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.


 

 


याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामविकास जयसिंग चौहान (वय २६, सध्या रा. भालेकर वस्ती, कर्वेनगर, पुणे, मूळ रा. राधिया देवरिया, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलेप्रकरणी सत्येंद्र राजपती चौहान (वय ३६, सध्या रा. शिंदे वॉशिंग सेंटर जवळ, देशमुखवाडी, शिवणे, पुणे, मूळ रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सोमवार दि.७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


 

 


मयत रामविकास चौहान याचा रूम मेट असलेल्या गोलू चौहान याने ठेकेदार सत्येंद्र चौहान याच्याकडून वर्षभरापूर्वी २५ हजार रुपये हातउसने घेतले होते. त्याला आता सत्येंद्र पैसे परत मागत होता, त्यासाठी गोलू चौहान याला मारहाण करण्याची धमकी देखील देत होता. या प्रकारामुळे घाबरून गोलू चौहान आणि मयत रामविकास याचा भाऊ कृष्णा चौहान हे दोघे पैसे न परता करता उत्तर प्रदेशला पळून गेले. हा प्रकार समजल्याने सत्येंद्र चिडला. त्याने ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान रामविकास याला ‘तूच त्यांना गावाला पळवून लावलेस, आता तूच माझे पैसे द्यायचे’ असे म्हणत त्याच्यासह दोन कामगारांना भालेकर वस्ती मधील ते राहत असालेल्या खोलीत शिवीगाळ करून कोंडून ठेवले. यानंतर झालेल्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या रामविकासने स्वयंपाकघरातील चाकूने गळ्यावर, पोटावर वार करून घेतले. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करत आहेत.


 

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.