Type Here to Get Search Results !

वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर रिक्षाचालकाला लुटले

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

A rickshaw puller was robbed just a call away from Warje Malwadi Police Station

 


पुणे, दि.२२ ऑक्टोबर २०२४ (Checkmate Times): राज्यभरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होताना दिसत असताना, पुण्यातील वारजे माळवाडी मध्ये तर पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर एका रिक्षाचालकाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये रिक्षाचालकाला दुचाकी आडवी घालून, त्याला दमदाटी करत, त्याच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल काढून घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला. याबाबत वारजे पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलिस स्टेशन जवळ अवघ्या काही पावलांवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या सह्याद्री शाळेसमोर, रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हि घटना घडली आहे. यामध्ये गोकुळनगर पठारावर राहणारा ३७ वर्षीय रिक्षाचालक रविवार दि.२० ऑक्टोबर २०२४ रात्री सव्वाबाराच्या सुमारास, आपली रिक्षा घेऊन जात असताना, सह्याद्री शाळेसमोर मागून आलेल्या एका अज्ञात दुचाकी चालकाने रिक्षाला दुचाकी आडवी लावून, ‘तुला नीट रिक्षा चालवता येत नाही का?’ असे म्हणून दमदाटी करून, त्याच्या खिशातील ‘दिवसभर रिक्षा चालवून मोठ्या कष्टाने कमावलेले’ १ हजार २७० रुपये रोख आणि मोबाईल काढून घेत पळून गेला. यानंतर रिक्षाचालकाने पोलिस स्टेशन मध्ये धाव घेत घडलेल्या घटनेबाबत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक रणजीत मोहिते पुढील तपास करत आहेत.

 


सदरील घटना घडलेले ठिकाण वारजे माळवाडीच्या मुख्य पोलिस स्टेशन पासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे. ज्या रस्त्यावर घटना घडली तो रस्ता सरळ रामनगर पोलिस चौकीकडे जातो आणि ती देखील तेथून अवघ्या ५०० मीटर पेक्षा कमी अंतरावर आहे. तर येथून वारजे माळवाडी पोलिस चौकी देखील १०० मीटर अंतरावर असेल. त्यामुळे घटना घडलेल्या ठिकाणच्या तीन बाजूना पोलिसांचे अस्तित्व असताना घडलेल्या या घटनेने या भागात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सध्या पूर्वीप्रमाणे मार्शल पेट्रोलिंग दिसत नसल्याच्या तक्रारी देखील नागरिक करत आहेत. विशेषतः रामनगर, सहयोग नगर, गोकुळनगर, अमर भारत सोसायटी, म्हाडा कॉलनी, आकाशनगर, वडारवस्ती, संभा नगर, मावळे आळी या वस्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गस्त अपेक्षित असल्याचे मत रहिवासी व्यक्त करतात.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.