Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.३ ऑक्टोबर २०२४ (Checkmate Times): एकीकडे देशभरात देवीच्या नवरात्री उत्सवाला
मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. देवीचेच रूप समजल्या जाणाऱ्या १२ वर्षीय
अल्पवयीन मुलीवर तिच्याच लिंगपिसाट बापाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला वारजे पोलिस स्टेशन हद्दीतून समोर आली आहे. या नराधम
बापा विरुद्ध ‘बाल लैंगिक अत्याचार’ पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला असून,
त्याला गजाआड करण्यात आले आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शाळेत घेतल्या जात
असलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ सेशन मधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत वारजे पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, वारजे मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या तिरुपती
नगर भागातील, आकाश नगर मध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. पती, पत्नी आणि पाच मुली
असलेले मुळचे उत्तर प्रदेशचे हे कुटुंब अनेक वर्षांपासून या भागात राहते. तर हा ३६
वर्षीय नराधम बाप घरातील सगळेजण रात्री झोपले की, आपल्या १२ वर्षीय मुलीला टेरेसवर
घेऊन जाऊन, तिला मारण्याची धमकी देऊन, गेल्या एक वर्षापासून लैंगिक अत्याचार करत
होता. बाप मारेल या भीतीने मुलगी घरात कोणाला काही बोलत नव्हती. मात्र शाळेत घेण्यात
आलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ सेशन मधून, समुपदेशक महिलेला या मुलीबाबत संशय आला.
त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला
आहे. यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यात तथ्य असल्याचे आढळून आले.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल
करून, त्याला अटक करण्यात आली आहे.
नवरात्रीच्या या ९
दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या ९ रूपांची पूजा केली जाते. मातेची ही ९ रूपे 'नवदुर्गा'
म्हणून ओळखली जातात. नवरात्रीच्या ९ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ
रूपांची पूजा केली जाते. त्यातली पहिली असती ती शैलपुत्री आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची
पूजा केली जाते. माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच
तिचे नाव शैलपुत्री पडले. अशा ‘पुत्री’ रूपातील मुलीवर बापाने लैंगिक
अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने, त्या बापाविरुद्ध समाजमनात रोष उत्पन्न झाला
आहे. या नराधमाला कठोर शिक्षा करा अशी मागणी महिलांमधून समोर येऊ लागली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share