Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.२६ ऑक्टोबर २०२४
(Checkmate Times): दामिनी मार्शलच्या चाणाक्ष दृष्टी आणि वेगवान तपासकामामुळे
शाळेतून चोरीला गेलेली तब्बल ५५ हजार रुपयांची सायकल परत मिळवून देण्यात पोलिसांना
यश आले आहे. तीन विद्यार्थ्यांनीच हि सायकल चोरून नेली असल्याचे यातून समोर आले
असून, त्यांना समज देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलिस स्टेशनच्या दामिनी मार्शल विद्या साळवे आणि
स्मिता कोंडे या मुली आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गस्त घालत असताना, त्यांना
कर्वेनगर मधील एका नामांकित शाळेतून इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या मुलाची महागडी इलेक्ट्रिक
सायकल चोरी झालेबाबत फोन आला होता. यावेळी त्या शाळेत जाऊन, दामिनी मार्शल्सने
एकूणच घटना समजून घेत याबाबत वरिष्ठांना घटनाक्रम सांगितला. त्यानुसार वारजे पोलिस
स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख
यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी मार्शल विद्या साळवे आणि स्मिता कोंडे यांनी
ठिकठिकाणच्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु करत, सायकल चोरून नेणाऱ्या दोन
संशयितांचा माग काढला असता, सायकल कोथरूड येथील एका नामांकित शाळेच्या मैदानात
लावली असल्याचे मिळून आली.
यावेळी सीसीटीव्हीच्या
आधारे त्या सायकलचे कुलूप उघडून सायकल घेऊन गेलेल्या त्या तीन मुलांना ओळखून,
त्यांना त्यांच्या पालकांसमोर याबाबत विचारणा केली असता, त्यांनी चेष्टा मस्करीतून
सायकल चोरल्याचे सांगितले. तर याबाबत ज्या मुलाची सायकल चोरीला गेली होती,
त्याच्या पालकांना बोलावून त्यांची संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात कोणतीही
कायदेशीर कारवाई करणेबाबत तक्रार नसल्याने, त्यांच्या ताब्यात सदरील तब्बल ५५ हजार
रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल देण्यात आली. त्याचबरोबर ज्या अल्पवयीन
विद्यार्थ्यांनी या सायकलची चोरी केली होती, त्यांना पुन्हा असे कृत्य न करणेबाबत,
तसेच अभ्यास करून आपले भविष्य घडवणेबाबत मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या
पालकांच्या ताब्यात देण्यात आले. एकूणच अवघ्या काही तासांमध्ये या दोन महिला
पोलिसांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे शाळा प्रशासनासह, पालकांनी कौतुक केले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share