Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये दीपक कादबाने यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याची गरज

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today


Warje needs a visionary traffic police officer like Deepak Kadbane

 

 

पुणे, दि.३० ऑक्टोबर २०२४ (Checkmate Times): साधारपणे ८ महिन्यांपूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये वारजेची वाहतुकोंडी सुटली होती. वारजे वाहतूक विभागात आलेले आणि अवघ्या ८ दिवसांमध्ये अनेक धाडसी निर्णय घेऊन वारजेची वाहतूक फोडल्याने सहायक पोलिस निरीक्षक दीपक कादबाने यांना बदलीचे बक्षीस मिळाले होते. मात्र त्यानंतर आलेल्या एकाही अधिकाऱ्याने आणि किंबहुना कर्मचाऱ्याने देखील कादबाने यांच्या पावलावर पाऊल ठेवले नाही. वाहतूक कोंडी सोडवण्याला प्राधान्य दिले नाही. त्यामुळे वारजेच्या वाहतूक कोंडीवर प्रचंड मोठा ताण येत असून, हि वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर दीपक कादबाने यांच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे मत वारजे मधील करदाते असलेली सामान्य जनता व्यक्त करते आहे.

 

सहायक पोलिस निरीक्षक दीपक कादबाने यांनी वारजे वाहतूक विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वात अगोदर वारजेची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काय करायला हवे याचा अल्पावधीतच अभ्यास केला. त्या अभ्यासावरून आणि रखडलेल्या, धूळ खात पडलेल्या फाईल्सवरची धूळ उडवून, कादबाने यांनी धाडसी निर्णय घेतले. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर पाचारण केले. पीएमपीएमएलचा बसथांबा हलवण्याचे धाडस केले. चालक नसताना कोणत्या मध्यस्थाला गाडी चालवायचा सांगून, ऐटीत मागे न बसता, स्वत: गाडी चालवत, गाडीच्या स्पीकर मधून वाहतूक कोंडी फोडण्याचे काम वारजे वाहतूक विभागाचा चार्ज घेतलेल्या तत्कालीन अधिकारी तुकाराम सुर्वे, अरुण कदम या अधिकाऱ्यांशिवाय कोणीही केल्याचे वारजेकरांना दिसले नाही. जो अधिकारी येईल तो, आहे त्या परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करत, वारजेच्या मुख्य हायवे चौकातून चारही बाजूला जात असलेल्या वाहनांना अभय देत, “आलीय भोगासी असावे सादर” प्रमाणे काम करताना दिसतात. त्यामुळे कितीही आणि कसेही रस्ते झाले तरी वारजेची वाहतूक कोंडी कधीही सुटणार नाही असे दिसते.

 

विश्वास पांढरे एक प्रयोगशील अधिकारी

त्याचबरोबर चेकमेट टाईम्सच्या पाहणीत हे देखील आले आहे की, पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाचे तत्कालीन पोलिस अधिकारी विश्वास पांढरे यांच्यासारखे वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता विश्वास पांढरे यांनी राबवलेले उपक्रम पुणेकर अजूनही विसरलेले नाहीत. विश्वास पांढरे हे स्वत: उपनगरातील अनेक चौकांमध्ये भेटी देऊन वाहतुकीचा आढावा घेत होते. मात्र त्यांच्यानंतर आलेले कोणतेही अधिकारी तसे करताना दिसत नाहीत. त्यामुळे वारजेच काय तर पूर्ण पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्या दृष्टीने काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे दिसते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.