Type Here to Get Search Results !

व्हाट्स अॅप ग्रुपमुळे दुकानदाराला मिळाले हरवलेले ३० हजार परत; वारजे मधील प्रकार

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

Shopkeeper gets back lost 30k due to WhatsApp group; Varieties in Warje

 


पुणे, दि.१८ ऑक्टोबर २०२४ (Checkmate Times): व्हाट्स अॅप ग्रुपमुळे चांगले वाईट अनुभव नेहमीच येताना दिसतात. काही ग्रुपमुळे जनजागृती आणि काही ग्रुपमुळे जनक्षोभ होतो. असाच वारजे माळवाडी मधील गोकुळनगर पठार भागातून व्हाट्स अॅप ग्रुपमुळे एका दुकानदाराला हरवलेले ३० हजार रुपये परत मिळाल्याचे समोर आले आहे.

 


 


याबाबत ग्रुप सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळनगर पठार येथील विकास डोंगरे हे दुकानातील साहित्य आणण्याकरीता जात असताना, त्यांच्या खिशातील रोख रक्कम ३० हजार रुपये हरवली होती. सदर रक्कम येथीलच पठार भागातील रहिवासी सुमंगला पुजारी यांना रस्त्यावर पडलेली मिळून आली. मात्र त्यांनी ती रक्कम स्वत:कडे न ठेवता, इमानदारीने येथील संत कृपा ग्रूपचे सदस्य लक्ष्मण कोके यांच्या दुकाना मध्ये आणून देत, ज्यांचे पैसे असतील त्यांना परत करा असे सांगितले. यानंतर संत कृपा ग्रुपचे अध्यक्ष सतीश मोरे यांना संपर्क करत सदरील बाब ग्रुपवर शेअर केली. यानंतर ती रक्कम विकास डोंगरे यांची असल्याचे समोर आले. यानंतर त्यांना ती रक्कम सुपूर्त करण्यात आली. यावेळी ग्रुपचे सदस्य दत्ता वराडे, संतोष चौधरी, ओमनात घवाडे, शाहु डोंगरे, सीद्दु नरोटे, करण कदम, विनोद राठोड, पिक्का पवार, रवी चव्हाण उपस्थित होते.


 

 


संत कृपा ग्रुप हा गोकुळनगर पठारावरील दत्तगुरु कॉलनी भागात कार्यरत आहे. येथील रहिवाश्यांचे एकीकरण, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे ग्रुपचे मुख्य उद्यिष्ठ आहे. संत कृपा ग्रुपच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. तर या प्रकारात एका मराठी दुकानदाराने दुसऱ्या मराठी दुकानदाराला मदत केली असल्याचे समोर येते आहे. “मराठी माणूस मराठी माणसाला मागे खेचतो” या वाक्याला फाटा देणारी हि घटना असून, सर्वच मराठी माणसांनी मराठी माणसांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवे आहेत अशा भावना ग्रुपने यावेळी व्यक्त केल्यात.


 

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 



Shopkeeper gets back lost 30k due to WhatsApp group; Varieties in Varje

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.