Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.२१ ऑक्टोबर २०२४
(Checkmate Times): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले
आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
भाजपाने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र निवडणुकीच्या
निकालानंतर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होणार आहे. यावर
चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून युट्युबवर घेतलेल्या कम्युनिटी कल चाचणी मध्ये भाजपा,
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असलेल्या महायुती मधून देवेंद्र
फडणवीस यांच्या नावाला अधिक पसंती असल्याचे दिसते आहे. त्यांना ३६ टक्के मते मिळाली
आहेत. तर २२ टक्के दर्शकांनी एकनाथ शिंदे आणि ११ टक्के दर्शकांनी अजित पवारांच्या
नावाला पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे यातील ३१ टक्के दर्शकांना महायुतीचा
मुख्यमंत्री कोण होईल याचा अंदाजच लावता येत नसल्याचे दिसते आहे. यामुळे महायुतीला
आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा लागणार असल्याचे दिसते.
तर महाविकास आघाडीने
देखील आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. या आघाडी मध्ये सध्या कॉग्रेस
आणि शिवसेना यांच्यात मतभेद सुरु असल्याचे समोर आले आहे. हे मतभेद समोर वेगळे दिसत
असले तरी आतून मुख्यमंत्री पदावरूनच असू शकतात असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त
करतात. यामध्ये चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून युट्युबवर घेतलेल्या कम्युनिटी कल
चाचणी मध्ये कॉंग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी
असलेल्या महाविकास आघाडी मधून उद्धव ठाकरे यांच्या नावाला अधिक पसंती असल्याचे
दिसते आहे. त्यांना ६८ टक्के मते मिळाली आहेत. तर ११ टक्के दर्शकांनी रोहित पवार आणि
६ टक्के दर्शकांनी नाना पटोले यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. इथेही दुसऱ्या
क्रमांकाची १६ टक्के पसंती “सांगता येत नाही” या कल चाचणीला आहे. त्यामुळे
महाविकास आघाडीला देखील आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा लागेल असे
दिसते. विशेष म्हणजे या दोन्ही वेगवेगळ्या कम्युनिटी कल चाचणी मध्ये कोणत्या
पक्षाचे सोशल मिडीयावर अधिक सक्रीय आहेत याचाही अंदाज आल्याशिवाय राहत नाही.
दोघांचा मुख्यमंत्री
पदाचा चेहरा ठरेना, निकालाच्या एका दिवसात न ठरल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती
राजवट
महाराष्ट्रातील
विधानसभा निवडणुकांसाठी फक्त ३५ दिवसांचा कालावधी दिला गेला आहे. २० नोव्हेंबर
२०२४ ला प्रत्यक्षात निवडणूक आणि २३ नोव्हेंबर २०२४ ला या निवडणुकांचा निकाल लागेल, तर २६
नोव्हेंबर २०२४ पर्यंत सरकार बनवावे लागेल. दोन पेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन
बनवण्यात आलेल्या पार्टनरशिपच्या राजकारणात निकालानंतर सरकार बनविण्यासाठी फक्त ४८
तास मिळणार आहे. त्यात वेळ काढला तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट
लागण्याची शक्यता राजकीय अभ्यासक व्यक्त करतात. महाराष्ट्राच्या सध्याच्या
विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. म्हणजे २४ ते २६ असा २८
तासांचा वेळ नवे सरकार बनविण्यासाठी मिळेल. तो पुरेसा होईल का? कारण आपण २०१९ चा
पहाटेचा शपथविधी अनुभवलेला आहे. तेव्हा किती उलथापालथ झाली होती? त्यामुळे ४८
तासांत सरकार स्थापन करून शपथग्रहण करावी लागेल. या काळात दोन्ही आघाड्यांना
आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावे लागेल. आमदारांच्या बैठका घेऊन नेता निवडीचे
सोपस्कार पार पाडावे लागतील. हे सर्व निकालानंतरच्या फक्त ४८ तासांत घडले नाही, तर
विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात
राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. त्यानंतर सहा महिन्यांसाठी
राष्ट्रपती राजवट लागू शकते किंवा राष्ट्रपतींच्या म्हणजे अर्थातच केंद्राच्या
मनात आले तर पुढील सोपस्कार पार पडतील अशा प्रकारचा अंदाज राजकीय अभ्यासक व्यक्त
करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share