Type Here to Get Search Results !

खडकवासला विधानसभेसाठी ६८ मतदारांनी केले घरून मतदान; तुम्हीही मतदानाला जाताना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र जवळ बाळगा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


68 voters voted from home for Khadakwasla Assembly; Carry any one of these identity cards with you while going to vote


 

 

पुणे, दि.१५ नोव्हेंबर २०२४ (Checkmate Times): खडकवासाला विधानसभा मतदारसंघांतर्गत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण ७० मतदारांनी फॉर्म क्रमांक १२ डी भरून गृहमतदानासाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी ६८ मतदारांनी गृह मतदान केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांनी दिली. त्याच्बार्बर मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला आहे. त्यातील कोणतेही एक ओळखपत्र दाखवल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती खडकवासला विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली आहे. मतदान केंद्रात मोबाइल वापरण्यास बंदी असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्याअनुषंगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. यामध्ये विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी दिपगौरी जोशी आणि किशोरी शिंदे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पडली. या पथकामध्ये १ मतदान अधिकारी, २ सहायक मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता. टपाली मतदान कक्षाचे प्रशासन कर्मचारी लौकिक दाभाडे यांनी या पथकासोबत समन्वय ठेवून गृह मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे तसेच सचिन आखाडे, अंकुश गुरव आणि साहीर सय्यद यांचे सहकार्य मिळाले.

 

 

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ऑनलाइन मतदारयादी उपलब्ध

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ऑनलाइन मतदारयादी उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली. मतदारांना ऑनलाइन माध्यमातून आपली माहिती तपासता येईल. यासाठी खालील लिंक उपलब्ध करण्यात आलेली आहे

ceo.maharashtra.gov.in

महसूल सहाय्यक वैभव मोटे यावेळी उपस्थित होते. डॉ. माने यांनी सांगितले की, मतदार यादीतील माहिती ऑनलाइन तपासून, मतदार कोणत्याही अडचणीविना मतदान करू शकतील. मतदारांनी त्यांच्या तपशीलांची योग्य पडताळणी करून मतदानाच्या दिवशी समस्या टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

मतदारांसाठी १२ पर्यायी ओळखपत्रांची यादी; वाहन आणि मोबाइलसाठी नियम

मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदारांनी आपल्या वाहनांची पार्किंग मतदान केंद्राच्या बाहेर २०० मीटर अंतरावर करावी. तसेच मोबाइल फोन देखील २०० मीटर अंतरावर ठेवावा असेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांनी सांगितले आहे. फक्त मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांनाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. मतदारांनी स्थलांतरित मतदान केंद्रांची माहिती फ्लेक्स किंवा फलकांवर उपलब्ध असणार असल्याने त्याचा आढावा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

वैध ओळखपत्रे:

१. आधार कार्ड

२. मनरेगा अंतर्गत रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड)

३. बँक/टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक

४. श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

५. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

६. पॅन कार्ड

७. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांचे स्मार्ट कार्ड

८. भारतीय पासपोर्ट

९. छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे

१०. केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम किंवा मर्यादित कंपन्यांचे छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र

११. संसद, विधानसभा, विधानपरिषद सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र

१२. दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिलेले विशेष ओळखपत्र

वरीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रस्तुत करून मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.