Type Here to Get Search Results !

खडकवासल्यात भिमराव तापकीर यांचा चौकार; विजय जनतेच्या विश्वासाला केला समर्पित

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Bhimrao Tapkir's four in Khadakwasla; He dedicated the victory to the trust of the people

 

 

पुणे, दि.२३ नोव्हेंबर २०२४ (Checkmate Times): "खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या तमाम नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाने मला चौथ्यांदा आपला लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे, यासाठी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. हा विजय केवळ माझा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. हा विजय आपल्या विकासाच्या स्वप्नांचा, आपल्या समस्यांच्या समाधानाचा, आणि एकत्रित काम करण्याच्या निर्धाराचा आहे. तुमच्या विश्वासाला हा विजय समर्पित करत अशा शब्दात खडकवासला विधानसभेचे विजयी उमेदवार भिमराव तापकीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

 

 

आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या प्रेमाने आणि भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच आज ही वेळ आली आहे. हा विजय हा फक्त निवडणूक लढविण्याचा नव्हे तर आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाकांक्षी आराखडा प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प आहे. आता पुढील वाटचाल ही आपणा सर्वांच्या सहकाऱ्यानेच होईल. खडकवासल्याच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज हा माझ्यासाठी प्राधान्य असेल. मला खात्री आहे की, आपल्या एकतेच्या जोरावर आपण आपल्या मतदारसंघाला विकासाच्या नवीन उंचीवर नेऊ अशा प्रकारच्या भावना भिमराव तापकीर यांनी व्यक्त केल्यात.

 

 

खडकवासला विधानसभेच्या या निवडणुकीत भिमराव तापकीर यांचा तब्बल ५२ हजार ३२२ मतांनी विजय झालाय. तापकीर यांना १ लाख ६३ हजार १३१ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सचिन दोडके यांना १ लाख १० हजार ८०९ मते मिळाली. तर मनसेच्या मयुरेश वांजळे यांना ४२ हजार ८९७ मते मिळाली आहेत. तर चौथ्या क्रमांकावर “वरील पैकी कोणी नाही” NOTA ला २ हजार ९०० मते मिळाली आहेत. त्यापाठोपाठ वंचितच्या संजय धिवार यांना २ हजार ६८७, पिपाणी सारखी दिसणारी जुनी तुतारी म्हणून ल्ख्ल्या गेलेल्या ट्रम्पेट चिन्हावर निवडणूक लढवलेले अपक्ष उमेदवार डॉ बाळासाहेब पोळ यांना १ हजार ५५९ मते मिळाली असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार असलेल्या राहुल मते यांना ५११ मते मिळाली आहेत. उरलेल्या इतर ८ उमेदवारांना ५०० पेक्षा कमी मते मिळाली असून, यामध्ये सचिन दोडके वगळता सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.

 

 

अमित ठाकरे यांच्यापेक्षा मयुरेश वांजळे यांना अधिक मतदान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारीवर, माहीम मतदार संघातून विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या अमित राज ठाकरे यांना या निवडणुकीत ३३ हजार ६२ एवढी मते मिळाली आहेत. तर पुण्यातील ८ पैकी ४ मतदार संघात निवडणूक लढवलेल्या मनसेच्या, खडकवासल्यात पहिली निवडणूक लढवलेल्या मयुरेश रमेश वांजळे यांना ४२ हजार ८९७ मते मिळाली आहेत. त्यापाठोपाठ हडपसरचे उमेदवार साईनाथ बाबर यांना ३२ हजार ८२१, कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे यांना १८ हजार १०५ आणि कसबा पेठचे उमेदवार असलेल्या गणेश भोकरे यांना ४ हजार ८९४ एवढी मते मिळाली आहेत. तर खडकवासला विधानसभेचा भिमराव तापकीर यांचा विजय घोषित होताच, मयुरेश वांजळे यांनी तापकीर यांचे अभिनंदन करणारे स्टेट्स ठेवले असून, आपण २०२९ च्या तयारीला सुरुवात करत असल्याचे घोषित केले आहे. त्याचबरोबर उद्यापासून सकाळी त्यांच्या धायरी येथील कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी उपस्थित असणार असल्याचा व्हिडीओ देखील स्टेट्स ठेवला आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.