Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. ३० नोव्हेंबर
२०२४ (Checkmate Times): बाणेर मधील भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष असलेल्या गणेश
कळमकर यांची भाजपच्या पुणे शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे
शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी कोथरूड
विधानसभा निवडणूक प्रमुख पुनीत जोशी, प्रल्हाद सायकर, प्रमोद कोंढरे, कसबा
मतदारसंघाचे मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर बाणेर मधील भाजपाच्या पदाधिकारी
कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत, फटाक्यांची आतषबाजी केली आहे. त्याचबरोबर
ठिकठिकाणी गणेश कळमकर यांच्या निवडीचे होर्डींग्ज झळकले आहेत.
भाजपाचे बाणेर
भागातील तरुण तडफदार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून कळमकर यांच्याकडे पाहिले
जाते. गणेश कळमकर यांनी यापूर्वी भाजपच्या शहर उपाध्यक्ष पदासह विविध पदांवर कामे
केली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची कोथरूड विधानसभा
मतदारसंघाच्या संयोजकपदाची जबाबदारी लीलया पेलली होती. बाणेर, बालेवाडी,
पाषाण परिसरात भाजपला मिळालेल्या भरघोस मतदानात त्यांचा मोलाचा वाटा
असल्याने निवडणुकीनंतर लगेचच कळमकर यांना पक्षाकडून महत्वाची जबाबदारी देण्यात आली
आहे.
याबाबत गणेश कळकर
यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, पक्षाने वेळोवेळी माझ्यावर
विश्वास ठेवून मला अनेक पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. राष्ट्र प्रथम या
भावनेतून मी पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे. बाणेर भागाच्या
विकासाकरिता आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि करत राहणार आहोत. तत्कालीन उच्च
आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली विकासासाठी कटिबद्ध असून, पुढील काळातदेखील सर्वांना एकत्र घेऊन
शहरात विकासाची कामे व पक्ष संघटन वाढवण्यावर माझा भर राहणार असल्याचे गणेश कळमकर
यांनी म्हटले आहे. गणेश कळमकर यांच्या पत्नी ज्योती कळमकर या बाणेर प्रभागाच्या
माजी नगरसेविका आहेत. उभयतांनी या भागात चांगले काम केले असल्याचे पक्षाध्यक्ष
धीरज घाटे यांनी नमूद करत, यामुळेच पक्षाने त्यांना हि मोठी जबाबदारी देण्याचा
निर्णय घेतला असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share