Type Here to Get Search Results !

खडकवासला विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत १७.५ टक्के मतदान

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


percent voting till 11 am in Khadakwasla assembly constituency


 

आदर्श मतदान केंद्र, सनसिटी कम्युनिटी हॉल, वडगाव बु. येथे मतदान करण्यासाठी लागलेली रांग

 

पुणे, दि.२० नोव्हेंबर २०२४ (Checkmate Times): खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत १७.५ टक्के मतदान झालेले आहे. मतदान केंद्र सुरू होण्यापूर्वी सकाळीच मॉर्निंग वॉल्कला आलेल्या मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. अपवाद वगळता सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु आहे. विशेषतः सोसायट्यांमधील मतदार सकाळी सकाळी बाहेर पडल्याचे समोर आले आहे.

 

 

वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिकेच्या कै. शामराव श्रीपती बराटे शाळेत मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया अंदाजे १० मिनिटांसाठी थांबली होती. त्यामुळे सकाळी सकाळी मतदान करून आपल्या नोकरी, व्यवसायाला मार्गस्थ होण्याच्या उद्देशाने सकाळच्या थंडीत आवरून आलेल्या मतदारांनी रोष व्यक्त केला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पूर्ववत मतदान प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मतदारांनी दिली. दरम्यान या निवडणूक प्रक्रियेसाठी 'वोटर टर्नआऊट' नोडल अधिकारी म्हणून कुणाल मंडवाले यांनी प्रमुख जबाबदारी स्वीकारली आहे. माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी अभिषेक धुमाळ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांना सहाय्यक अधिकारी वैभव मोटे यांची साथ लाभली आहे. याशिवाय, ज्योती उपाशी आणि रविकांत बडेकर यांनी मतदारांना माहिती पुरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मतदारांसाठी सुसज्ज सुविधा केंद्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच योग्य नियोजनामुळे मतदान प्रक्रियेला अधिक गती आणि पारदर्शकता मिळाली आहे. मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला आहे.

 

 

मतदारांसाठी १२ पर्यायी ओळखपत्रांची यादी; वाहन आणि मोबाइलसाठी नियम

मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदारांनी आपल्या वाहनांची पार्किंग मतदान केंद्राच्या बाहेर २०० मीटर अंतरावर करावी. तसेच मोबाइल फोन देखील २०० मीटर अंतरावर ठेवावा असेही निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले आहे. फक्त मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांनाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. मतदारांनी स्थलांतरित मतदान केंद्रांची माहिती फ्लेक्स किंवा फलकांवर उपलब्ध असणार असल्याने त्याचा आढावा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

वैध ओळखपत्रे:

१. आधार कार्ड

२. मनरेगा अंतर्गत रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड)

३. बँक/टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक

४. श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

५. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

६. पॅन कार्ड

७. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांचे स्मार्ट कार्ड

८. भारतीय पासपोर्ट

९. छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे

१०. केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम किंवा मर्यादित कंपन्यांचे छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र

११. संसद, विधानसभा, विधानपरिषद सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र

१२. दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिलेले विशेष ओळखपत्र

वरीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रस्तुत करून मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात.

 

 

यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघातील २ लाख ७२ हजार ७८० महिला मतदार, ३ लाख ३ हजार ६८४ पुरुष मतदार आणि ४१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असलेल्या या मतदार संघात, ४५९ शहरी आणि ४८ ग्रामीण मतदान केंद्रावर हि निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये वडगाव बुद्रुक मध्ये महिलांसाठी विशेष पिंक मतदान केंद्र आणि मतदानासाठी एक वेगळे मॉडेल ठरावे असे आदर्श मतदान केंद्र, बहुली मध्ये फक्त तरुणांना मतदान करण्यासाठी युवा मतदान केंद्र असणार आहेत. मतदार संघात एकूण २ हजार २७४ दिव्यांग मतदार आणि ५५ अंध मतदारांची नोंद असून, त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आंबेगाव बुद्रुक येथील एका शाळेत मतदान साहित्य वितरणासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले होते. या कक्षांमध्ये इव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदार यादी, मतदानासाठी आवश्यक सर्व साहित्य, तसेच अन्य संबंधित सामग्रीचा समावेश होता. आपण चेकमेट टाईम्सवर एक्सक्लूजिव्ह पाहू शकता की कशा पद्धतीने मतदान यंत्र तपासून ती १२२ बसेस आणि एका जीपच्या सहाय्याने सुरक्षितरीत्या रवाना करण्यात आलेली आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.