Type Here to Get Search Results !

कोथरूड विधानसभा मतदार संघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह ९५ मतदारांनी बजावला “वोट फ्रॉम होम” मतदानाचा हक्क

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha

Former President of India Pratibha Patil along with 95 voters exercised their “Vote from Home” right in Kothrud Assembly Constituency.

 

 

पुणे, दि.१५ नोव्हेंबर २०२४ (Checkmate Times): कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी आपल्या घरातून मतदानाचा हक्क बजावला. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान नोंदवून घेण्यात येत आहे. त्यापैकी आज ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले ९१  जेष्ठ नागरिक तसेच ४ दिव्यांग मतदार असे एकूण ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आयोगाचे आभार मानले. या प्रक्रियेकरिता विधानसभा मतदारसंघात एकूण आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे, पथकाच्यावतीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.

 

 

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ऑनलाइन मतदारयादी उपलब्ध

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ऑनलाइन मतदारयादी उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली. मतदारांना ऑनलाइन माध्यमातून आपली माहिती तपासता येईल. यासाठी खालील लिंक उपलब्ध करण्यात आलेली आहे

ceo.maharashtra.gov.in

मतदार यादीतील माहिती ऑनलाइन तपासून, मतदार कोणत्याही अडचणीविना मतदान करू शकतील. मतदारांनी त्यांच्या तपशीलांची योग्य पडताळणी करून मतदानाच्या दिवशी समस्या टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

मतदारांसाठी १२ पर्यायी ओळखपत्रांची यादी; वाहन आणि मोबाइलसाठी नियम

मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदारांनी आपल्या वाहनांची पार्किंग मतदान केंद्राच्या बाहेर २०० मीटर अंतरावर करावी. तसेच मोबाइल फोन देखील २०० मीटर अंतरावर ठेवावा असेही निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले आहे. फक्त मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांनाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. मतदारांनी स्थलांतरित मतदान केंद्रांची माहिती फ्लेक्स किंवा फलकांवर उपलब्ध असणार असल्याने त्याचा आढावा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

वैध ओळखपत्रे:

१. आधार कार्ड

२. मनरेगा अंतर्गत रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड)

३. बँक/टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक

४. श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

५. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

६. पॅन कार्ड

७. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांचे स्मार्ट कार्ड

८. भारतीय पासपोर्ट

९. छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे

१०. केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम किंवा मर्यादित कंपन्यांचे छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र

११. संसद, विधानसभा, विधानपरिषद सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र

१२. दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिलेले विशेष ओळखपत्र

वरीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रस्तुत करून मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.