Type Here to Get Search Results !

शिवसेना सिंहगड रोडचे पहिले नगरसेवक हरिश्चंद्र दांगट यांचे निधन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Shiv Sena Sinhagad Road's first corporator Harishchandra Dangat passes away

 

 

पुणे, दि. १ डिसेंबर २०२४ (Checkmate Times): पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट यांचे आज रविवार दि.१ डिसेंबर २०२४ सकाळी निधन झाले. हरिश्चंद्र दांगट यांचा जन्म पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या वडगाव बुद्रुक येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. शिवसेनेचे वडगाव बुद्रुक शाखाप्रमुख म्हणून त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. त्यांना हरिश्चंद्र आण्णा दांगट म्हणून सर्वजण आदराने बोलत असत. सिंहगड रोडवरील नागरी समस्या सोडवण्यास त्यांनी सुरुवात केली होती. शिवसाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक छोट्या व्यवसायिकांना कर्ज उपलब्ध करून देऊन, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात हरिश्चंद्र दांगट यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर सिंहगड रोडवरील अभिरुची मॉल शेजारी महालक्ष्मी मंदिर येथे पहिला राजमाता जिजाऊ सार्वजनिक नवरात्र उत्सव दांगट यांनी सुरु केला होता. या ठिकाणी सिंहगड रोडवरील पहिला सांस्कृतिक महोत्सव त्यांनी सुरु केला.

 

१९९७ साली वडगाव बुद्रुक गावाचा पुणे मनपा मध्ये समावेश झाला आणि त्यानंतर २००० साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत या समविष्ट गावाचे पहिले नगरसेवक म्हणून दांगट निवडून आले होते. हिंगणे, वडगाव आणि धनकवडी असा प्रभाग त्यावेळी असल्याचे राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते सांगतात. त्यांनी नगरसेवक म्हणून या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत, या भागाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवल्याचे अनेकजण सांगतात. पश्चिम हवेलीतील सर्व सामान्य कार्यकर्ते आणि गोर गरिबांना त्यांनी कायम आधार दिला. सिंहगड रोड वर भव्य दिव्य असे महालक्ष्मी आणि साईबाबा मंदिर त्यांनी उभे केले. या ठिकाणी अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचे वाढदिवस व इतर शुभकार्य पार पडत आहेत. या भागातील पत्रकार, पेपर विक्रेते, मूर्तिकार अशा अनेक लोकांना त्यांनी कायम साथ दिली. नुकताच त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

 


हरिश्चंद्र दांगट यांच्याबद्दल आपल्याला आणखीन माहिती असेल जी जनसामान्यांना समजली पाहिजे असे आपल्याला वाटत असेल तर अशी खात्रीशीर माहिती आपण आम्हाला खालील नंबर वर whats app करू शकता.


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.