Type Here to Get Search Results !

बारमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Bavdhan police take action against hookah parlor running in bar; case registered against two

 

 

पुणे, दि. १५ जानेवारी २०२५ (Checkmate Times): बावधन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील म्हाळुंगे मध्ये असलेल्या बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (वय २१, रा. वाकड, पुणे) आणि राहुल श्रीकांत कुलकर्णी (वय ३७, रा. मैताळवाडी फाटा, भूगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा घालून कारवाई केली. हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता ग्राहकांची गर्दी करून त्यांना जेवण्यास व हुक्का पिण्यास एकत्र बसविल्याचे पोलिसांच्या छाप्यात समोर आले. तर तपासात हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होते. याप्रकरणी पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे (वय ३२) यांनी बावधन पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार किरण बुलबुले पुढील तपास करत आहेत. “संबंधित हॉटेलमधील दारू विक्रीचा परवाना एका महिलेच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हॉटेल मालकाचा शोध सुरू आहे. यात किती भागीदार आहेत?, भाडेकरार आहे का?, याबाबत तपास सुरू असल्याचे बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.”

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.