Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. ११
जानेवारी २०२५ (Checkmate Times): कर्वेनगर मधील बंद असलेल्या बंगल्याचा अंदाज
घेऊन, अज्ञात चोरट्यांनी खिडकीच्या ग्रील आणि काचा उचकटून घरात प्रवेश मिळवत
घरातील कपाटात ठेवलेले लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना
समोर आली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात वारजे
पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे
पुढील तपास करत आहेत.
याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील घरफोडीचा प्रकार कर्वेनगर मधील वेदांत नगर मध्ये
असलेल्या “एकदंत” बंगल्यात शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रात्री ८ वाजल्यापासून
पासून बुधवार दि. ८ जानेवारी २०२५ सकाळी ९.४५ च्या दरम्यान घडला. यामध्ये अज्ञात
चोरट्याने बंद असलेल्या बंगल्याच्या खिडकीच्या ग्रील आणि काचा कशाच्यातरी सहाय्याने
उचकटून, घरात प्रवेश मिळवत, बेडरूम मधील कपाटात ठेवलेले २ लाख ४० हजार रुपये
किमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि कॅमेरा असा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. याबाबत
बंगल्याच्या मालकांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार वारजे पोलीस स्टेशन
मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये वारजे पोलीस स्टेशन
हद्दीतील पोलीस गस्त कमी झाली असून, असलेल्या गस्तीवरील पोलिसांचे लक्ष काही
वेगळ्याच दिशेने असल्याने वारजे पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली
असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त
केली असून, हद्दीतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सक्षम गस्त गरजेची
असल्याचे मत रहिवासी नागरिक व्यक्त करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share