Type Here to Get Search Results !

मुळा नदीपात्रात सुरु असलेले अतिक्रमण थांबवा, अन्यथा आंदोलन; ज्योती कळमकर यांचा पिंपरी मनपाला इशारा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Stop the encroachment in the Mula riverbed, otherwise there will be agitation; Jyoti Kalamkar warns Pimpri Municipal Corporation

 

 

पुणे, दि. १५ जानेवारी २०२५ (Checkmate Times): पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील पिंपळे निलख, विशालनगर भागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रामधील होणारे अतिक्रमण त्वरित थांबवावे. त्याचबरोबर नदीपात्रात चालू असलेले सुरक्षा भिंतीचे काम त्वरित थांबवून, नदीपात्रात टाकलेला राडारोडा व मातीचा भराव त्वरित काढून टाकावा अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाणेर भागातील माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना एका पत्राद्वारे दिलाय.

 

सद्यस्थितीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दी मध्ये विशाल नगर भागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रात अगदी नदी पात्रामध्ये मातीचा प्रचंड मोठा ढिग लावला आहे. यामुळे नदीची नैसर्गिक रुंदी कमी होत आहे. या पूर्वी देखील विशाल नगर भागातून नदी पात्रात मातीचा भराव टाकून व राडारोडा टाकून नदीचे पात्र कमी केले गेले असल्याकडे देखील ज्योती कळमकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. या नदीपात्रातील अतिक्रमणामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नदी तुडुंब वाहून विशाल नगरच्या विरुद्ध बाजूला असलेल्या बाणेर, बालेवाडी भागातील सोसायट्यांमध्ये व बालेवाडी येथील भीमनगर भाग, प्रथमेश पार्क, डी. एस. के. गंधकोष, कपिल मल्हार सोसायटी, साईदत्त रेसिडेन्सी, अल्लूर सोसायटी, दत्तनगर विधाते वस्ती भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा शिरकाव होत असून लोकांचे जीवनमान विस्कळीत होते. त्याचा आर्थिक फटकाही दरवर्षी त्यांना बसतो. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये अचानक मुसळधार पाउस पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या आपतकालीन मदत यंत्रणांवर देखील ताण येत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर होण्याच्या घटना घडत असताना देखील, याकडे पालिका डोळेझाक करणार असेल तर तीव्र जन आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नसल्याचे कळमकर यांनी अधोरेखित केले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.