Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. २०
जानेवारी २०२५ (Checkmate Times): कोथरूड मध्ये चौक
सुशोभीकरण आणि त्या चौकातून जाणाऱ्या नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती तेवत राहण्याच्या
चांगल्या उद्देशाने लावण्यात आलेले “ते शौर्य शिल्प काढून टाकण्याची मागणी राष्ट्रप्रेमी
नागरिकांनी केली आहे.” या चौकात लावण्यात आलेल्या या शिल्पाभोवती भलत्यांचेच
नसलेले शौर्य अनेकदा बेकायदा फ्लेक्सच्या माध्यमातून झळकत असते. त्यामुळे हे शिल्प
अर्ध्यापेक्षा अधिक काळ झाकलेले असते. मग हे शिल्प लावण्याचा उद्देश काय ?
त्यासाठी खर्च कशाला ? असा सवाल करत, हा चौक “फ्लेक्स चौक” म्हणून घोषित केला
पाहिजे, अशा भावना या भागातील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चेकमेट टाईम्स बरोबर
बोलताना व्यक्त केल्या आहेत. यावर आता पुणे महानगरपालिकेचे कोथरूड बावधन क्षेत्रीय
कार्यालय आणि पालिकेचा आकाशचिन्ह विभाग कशा पद्धतीने कार्यवाही करतो, हे पाहणे
महत्वाचे ठरणार आहे.
कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते एकलव्य महाविद्यालय डीपी
रस्त्यावर हे शिल्प लावण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या चौकातून राज्याचे उच्च आणि
तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील
यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार असलेल्या मुरलीधर मोहोळ
यांचे मोठ्या प्रमाणात अवागमन असते. त्यांचे या गंभीर बाबीकडे लक्ष कसे जात नाही
असा सवाल येथील राष्ट्रप्रेमी नागरिक विचारत आहेत. तर काही नागरिकांनी यावर आक्षेप
घेत “त्यांचेच छायाचित्र असलेले फ्लेक्स या चौकात जास्त प्रमाणात लागत असतात” असे
म्हणत, त्यांचीच याला मूक संमती असणार असा आरोप केलाय. त्याला महानगरपालिकेचा
कोणताही विभाग काहीही करू शकणार नाही, असे आव्हानच यावेळी केले आहे. तर एका राष्ट्रप्रेमी
नागरिकाने तर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या करातून पगार
मिळतो, हे ते विसरले असल्याचे म्हणत, ते त्या त्या वेळच्या सत्ताधारी पक्षांचे आणि
पदाधिकाऱ्यांचे वेठबिगारी म्हणून काम करणे पसंत करत असल्याचाच थेट आरोप केला आहे.
त्यामुळे हे शिल्प काढून या शिल्पात असलेल्या राष्ट्रध्वज आणि देशाच्या
संरक्षक सैनिकांचा अवमान थांबवण्यासाठी हे शिल्प इतरत्र चांगल्या ठिकाणी हलवावे
अशी मागणी एकमुखाने होऊ लागली आहे. एकूणच कोथरूड मधील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या
या शिल्पाभोवती लागणाऱ्या आणि शिल्प झाकणाऱ्या फ्लेक्स बाबत संतप्त भावना असल्याचे
स्पष्ट होत आहे. यावर आता कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आणि पालिकेचा आकाशचिन्ह
विभाग कशा पद्धतीने कार्यवाही करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर
भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावनांचा किती आदर करतात
हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share