Type Here to Get Search Results !

सिंहगड रोडवरील या भागात वाहतूक आणि पार्किंग क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण बदल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Significant changes in traffic and parking areas in this area on Sinhagad Road

 

 

पुणे, दि. १० जानेवारी २०२५ (Checkmate Times): सिंहगड रोड वाहतुक विभागाचे हद्दीमधील वाहतूक व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्थेमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांची सोय आणि काहींची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या संभाव्य त्रासापुर्वी हे बदल जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

 




यामध्ये प्रामुख्याने भुमकर चौक अंडरपास, नऱ्हे धायरीगाव, मानाजीनगर हा भाग नव्याने पुणे महानगरपालिकेच्या स्थलसीमेमध्ये सामिल करण्यात आल्याने सदर भागात रहिवासी भागात वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरे, सोसायट्यांची बांधकामे चालू आहेत. नऱ्हे परिसरात इंडस्ट्रीयल एरिया असल्याने दिवसेंरात्र सदर भागात जाणारी जड वाहने ही भुमकर चौकातुनच ये-जा करत असतात. जड वाहने व स्थानिक नागरिक दळवळणाकरीता भुमकर चौक ते कंट्रोल चौक हाच रस्ता प्रामुख्याने वापरतात. सदर भागात शाळा, कॉलेज, हॉस्पीटल असल्याने गर्दीच्या वेळांमध्ये (पिक अवर्स) मध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. भुमकर चौक ते कंट्रोल चौक हा रस्ता अरुंद असल्याने, जड वाहतूकीमुळे सदर भागात वारंवर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून सदरबाबत वारंवार तक्रारी अर्ज येत असल्याने, त्याकरिता जनतेस पोहचणारा धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी सिंहगड रोडवरील भुमकर चौक अंडरपास नऱ्हे गाव ते श्री कंट्रोल चौक पर्यत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यत व सांयकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यत या रस्त्यावर, तसेच या मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या इतर अंतर्गत रस्त्यांवर सर्व प्रकारच्या जड, अवजड, मंदगती वाहनांची वाहतूक तसेच पार्किंग करण्यास अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ. खेरीज बंदी करण्यात येत आहे.

 

त्याचबरोबर सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायद्यानुसार मॅकडॉनल्डस् समोर दोन्ही बाजुस ५० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांच्या काही सुचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफीस, बंगला नं-६ एअरपोर्ट रोड पुणे यांचे कार्यालयात दिनांक ०९ जानेवारी २०२५ ते २३ जानेवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.