Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. १४
जानेवारी २०२५ (Checkmate Times): अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या कर्वेनगर
मधील गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले असताना देखील तडीपारी आदेशाचे उल्लंघन
करत, पुणे शहरात प्रवेश करत गुन्हा केला. त्यानंतर त्याला स्थानबध्द करणे बाबत आदेश
पारित केल्यावर फरार झालेल्या अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४ वर्षे, रा.
जाधव चाळ, काकडे पॅलेस समोर, कर्वेनगर,
पुणे) याला महिनाभरात लोणावळा येथून अटक करण्यात वारजे पोलिसांच्या
तपास पथकाला यश आले आहे.
अभिजीत उर्फ
चोख्या तुकाराम येळवंडे याने ५ जून २०२१ रोजी वारजे पोलीस स्टेशन हद्दीत एका
बांधकाम व्यावसायिकावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करुन हल्ला केला
होता. त्याचे सोबत सदर गुन्ह्यामध्ये आणखीन ३ सह आरोपी सामील होते. सदर
गुन्ह्यामध्ये त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. सदर
गुन्ह्यामध्ये तो येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंदिस्त होता. त्यानंतर २१
नोव्हेंबर २०२३ रोजी तो जामीनावर बाहेर आला. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने गप्प
न बसता आपली गुन्हेगारी चालूच ठेवली आणि त्याचेवर वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र
गुन्हा दाखल झाला. यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पोलीस
अंमलदार खिलारी व तळेकर यांनी अभ्यासपुर्ण असा प्रस्ताव बनवुन तो धोकादायक व्यक्ती
बनला असुन, त्याचे धोकादायक हालचालीमुळे कर्वेनगर परीसरात
शांततेत चाललेल्या जन जीवनास वारंवार अडथळे निर्माण होत असल्याबाबत परिमंडळ ३ चे पोलीस
उप-आयुक्त संभाजी कदम यांचेकडे तडीपार प्रस्ताव सादर केला होता. कदम यांनी २८
ऑगस्ट २०२४ रोजी त्यास पुणे जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता तडीपार केले होते.
या तडीपार
कालावधित सुध्दा त्याने विनापरवाना पुणे शहरात प्रवेश केल्याने त्याचे विरुद्ध
वारजे माळवाडी येथे गुन्हा दाखल झाल्याने. त्यास स्थानबध्दकरणे बाबत प्रस्ताव तयार
करून तो पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. त्यावरुन पोलीस आयुक्त अमितेशकुमार
यांनी त्यास दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी पासुन एक वर्षा करीता नाशिक मध्यवर्ती
कारागृह येथे स्थानबध्द करण्याबाबत आदेश दिले होते. परंतु तेव्हा पासुन अभिजीत
उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे हा फरार झाला होता. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा
आणि वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या तावडीत सापडू नये यासाठी तो पुरेपुर दक्षता
घेत होता. दरम्यान अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण
पाटील व पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या भेटी
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना सदर आरोपीला लवकरात ताब्यात
घेण्यासाठी निर्देश दिलेले होते. यानंतर कोथरुड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब
पठारे, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस
उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पोलीस अंमलदार योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुमार, प्रशांत चव्हाण, रियाज
शेख, विजय खिलारी आणि किरण तळेकर यांच्या पथकाने अभिजीत उर्फ
चोख्या तुकाराम येळवंडे याला ताब्यात घेण्याकरीता योजना तयार केली.
त्यानंतर
मिळालेल्या गोपणीय माहीतीनुसार तो लोणावळा व परिसरात ठिकाणे बदलुन राहत असल्याची
माहीती मिळाली असता, वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक
संजय नरळे,
पोलीस अंमलदार योगेश वाघ, शरद पोळ यांनी लोणावळ्यात
जाऊन गुरुवार दि. ९ जानेवारी २०२५ रोजीच्या रात्रभर व दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. १०
जानेवारी २०२५ दिवशी पुर्ण दिवसभर त्याचा त्या परिसरात शोध घेऊन अत्यंत चतुराईने
त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी नाशिक कारागृहात पाठवले
असल्याचे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे
यांनी सांगितले. विश्वजित काईंगडे यांनी वारजे पोलीस स्टेशनचा पदभार
स्वीकारल्यानंतर हद्दीत अत्यंत धडाकेबाज कामगिरी सुरु केली असल्याच्या चर्चा
गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. सत्कार स्वीकारण्यापेक्षा
कामावर अधिक भर देणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे.
अनेकांकडून वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये असेच अधिकारी हवे होते अशा प्रकारची
वक्तव्ये समोर येऊ लागली आहेत. तर काही जण त्यांच्या स्वभावाचा बाहेरून अभ्यास करत
असल्याचे दिसत आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने काईंगडे
यांनी सुरु केलेला धडाका स्वागतार्ह असल्याचे मतही व्यक्त होत असून,
त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याची महापालिका निवडणुक कालावधीत अधिक गरज असल्याचे मत
राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. दरम्यान वारजे पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांची कमी
झालेली दृश्यमानता पुन्हा एकदा वाढू लागली असून, गस्त आणि दृश्यमानता वाढल्यास
गुन्ह्यांना आळा घालण्यास अधिक मदत होईल आणि नागरिकांच्या मनातील भीती कमी होण्यास
मदत होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share