Type Here to Get Search Results !

सहकारी संस्था कार्पोरेट पध्दतीने चालविणे आवश्यक; सहकार भारतीच्या कार्यकारिणी जाहीर कार्यक्रमात सुधीर पंडीत यांच्या भावना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Sahakar Bharati Pune Metropolitan Corporation's executive committee for the period 2024 - 2027 announced

 

 

पुणे, दि. १४ जानेवारी २०२५ (Checkmate Times): सहकारी संस्था चालवितांना सुशासन अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे संस्थेची प्रगती होते. सहकारामुळे समाजाची उन्नती होते. सहकारी संस्थेला गालबोट लागणार नाही याची खबरदारी व्यवस्थापनाने घेतली पाहिजे, असे मत सहकाराचे अभ्यासक व पर्वती देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त सीए. सुधीर पंडीत यांनी व्यक्त केले. सहकारी संस्था स्थापन करून त्या कार्पोरेट पध्दतीने चालविणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी सहकारामध्ये यशस्वी झालेल्या अमूलचे उदाहरण देखील पंडित यांनी यावेळी दिले. ४६ वर्षांपूर्वी स्व. लक्ष्मणराव इनामदार यांनी सहकार भारती या संस्थेची स्थापना केली. राष्ट्र उभारणीत सहकाराचे महत्त्व ओळखून सहकार चळवळीची गुणात्मक वाढ व्हावी या उद्देशाने सहकार भारतीची स्थापना ११ जानेवारी १९७९ रोजी करण्यात आली. या स्थापना दिनाचे औचित्य साधून सहकार भारती पुणे महानगराची सन २०२४-२०२७ या कालावधीसाठीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

 

जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी सी.ए. अभय माटे आणि सहकाराचे गाढे अभ्यासक तसेच जनता सहकारी बँकेचे संचालक व देवदेवेश्वर संस्थानचे १८ वर्षांपासून विश्वस्त असलेले सी.ए. सुधीर पंडित तसेच सहकार भारतीचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना सहकार भारतीचे राष्ट्रीय बैंकिंग प्रकोष्ठ प्रमुख व जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अभय माटे म्हणाले की, संस्था चालवितांना पदाचा अहंकार नसावा व पदाकडे जबाबदारी म्हणून पहावे. प्रामाणिकपणे काम केल्यास संस्था यशस्वीपणे चालतात. सहकार भारतीच्या कार्यकारिणीत पुणे महानगरचे अध्यक्ष म्हणून उद्यम विकास सहकारी बँक पुणेचे अध्यक्ष सी.ए. दिनेशकुमार गांधी, महामंत्री म्हणून श्रीगोंदा येथील रुक्मिणी सहकारी बँकेचे अध्यक्ष सी.ए. वसंतराव गुंड, संघटन प्रमुख म्हणून निलकंठ नगरकर यांच्यासह सहकारी बँका, पतसंस्था आणि विविध प्रकोष्ठ, विभाग प्रमुख यांसह ३८ जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सहकार भारताच्या पूर्व अध्यक्षा कै. शशिताई अहिरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गिरीश भावळकर यांनी केले. या कार्यक्रमास पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, सहकार भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशचे सहकोषाध्यक्ष औदुंबर नाईक, गृहनिर्माणचे सहप्रकोष्ठ प्रमुख देवदत्त बोराळकर, प्रदेश साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर, विनायक साखरे यांच्यासह अनेक सहकारी बँकांचे, पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

पुणे महानगर पदाधिकारी सदस्य यादी...

१. अध्यक्ष - CA दिनेशजी गांधी

२.उपाध्यक्ष व संपर्क - श्रीप्रसाद रिसबुड

 उपाध्यक्ष व प्रशिक्षण - सुचित्रा दिवाण

३.महामंत्री - CA वसंतराव गुंड

४.संघटन प्रमुख - नीलकंठ नगरकर

५.सह-संघटन प्रमुख - CA अथर्व नवसारीकर

६.सचिव - प्रकाश पटवर्धन.

७.महिला प्रमुख - Adv.वैशाली राणा

८.महिला सह-प्रमुख - श्रुती मनोरे

९.कोषप्रमुख - दीपक अहिरे

१०.सह-कोषप्रमुख - प्रशांत कुलकर्णी

११.पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख- वसुधा खरे

१२.सह-प्रमुख - शिवाजी कोथमिरे

१३.बँक प्रकोष्ठ प्रमुख - CA डॉ.केतन जोगळेकर

१४.सह-प्रमुख - CA निलेश येवलेकर

१५.गृहनिर्माण प्र.प्रमुख.- नितीन टाकळकर

१६.गृहनिर्माण सह-प्रमुख - विलास नऱ्हे

१७.IT/मीडिया प्रकोष्ठ प्रमुख - हेरंब दामले

१८.IT /मीडिया सह-प्रमुख- धनंजय पाटील

१९.ऑडिट प्रकोष्ठ प्रमुख  - प्रकाश पाठक

२०.बचत गट प्र. प्रमुख- बोरकर भाग्यश्री.

२१.बचत गट प्र.सह-प्रमुख - भरेकर सुवर्णा

२२.साखर प्र.समन्वयक - बाळ भिंगारकर

२३.विधी प्रकोष्ठ प्रमुख - Adv. हर्षल परब

२४.मल्टिस्टेट प्रकोष्ठ प्रमुख- श्रीकृष्ण घोलप

२५.सो.मीडिया प्रसिद्धी - देवदत्त कसबेकर

२६.सदस्य - राजेंद्र पवार 

२७.सदस्य- भास्कर चिल्लाळ

२८.सदस्य- भाऊसाहेब पवार

२९.सदस्य - आर्किटेक्ट रवी संत

३०.सदस्य - सिद्धांत धस.

३१.सदस्य - CA अथर्व मेहेंदळे. 

३२.सदस्य - कर्नल समीर पेंडसे.

३३.सदस्य - विश्वास फाटक.

३४.सदस्य - मधुरा कुलकर्णी

३५.सदस्य - दीपक चौधरी 

३६.सदस्य - आनंद दलाल

 

विधानसभा / तालुका अध्यक्ष

१) कसबा विधानसभा अध्यक्ष - नंदकुमार राऊत

२) शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष - जयदीप पारखी

३) कोथरूड विधानसभा अध्यक्ष - जयंत अजोटीकर

४) खडकवासला विधानसभा अध्यक्ष - अल्पना देशपांडे

५) वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष - जितेंद्र जगताप

६) पुणे काँटेन्मेंट विधानसभा अध्यक्ष - अरुणा शिंदे

७) हडपसर विधानसभा अध्यक्ष - राजश्री दीपक लगड

८) पुणे काँटेन्मेंट बोर्ड विधानसभा अध्यक्ष - सविता ठाकूर

९) मांजरी गाव - पल्लवी टाकळे

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.